पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३०. २२९ श्रीवसिष्ठ 'रामा, हा प्रपच मायिक आहे. यास्तव त्यांत वरील नियम जरी राहिला नाही तरी त्यात काही दोष नाही. ज्याची दृष्टि मद झाली आहे अशा पुरुषास, उजेडाकडे पाहू लागले असता, डोळ्यापुढे अतराळी जसे कुरळ्या केसाचे आकार दिसतात, त्याप्रमाणे या सर्व- व्यापी अनतात्म्यामध्ये अवरणासह ही सर्व ब्रह्माडे भासतात. किवा · सर्व वस्तु ईश्वराच्या इच्छेच्या अवीन आहेत. यास्तव त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व व्यवहार होत असताना आमी मनुष्यानी ठरविलेला एकादा नियम जरी बाधित झाला तरी त्यात काही दोष नाही. शिवाय अधः, ऊर्ध्व इत्यादि कल्पना मापेक्ष आहेत. ह्मणजे फुलाच्या अपेक्षेने देठ खाली असते, देठाच्या अपेक्षेनें फुल वर असते, इत्यादि व्यवहार जसा आपण नेहमी करितो त्याप्रमाणे महापृथ्वीरूप जो हा ब्रह्माडाचा भाग तो अधोभाग व त्याहून निराळा जो नभोभाग तो ऊर्ध्व भाग, अशी कल्पना केलेली आहे. पण यावर तू ह्मणशील की, खरोखरच जर अधोभाग नाही, ती केवळ सापेक्ष कल्पना आहे, तर देठापासून मुटलेले फळ जे नियमाने खाली येते ते का ? गुरुत्वामुळे होणारे फल-पतन अधर-दिशेन्या अस्तित्वावाचून होणे अशक्य आहे तर त्याचे कारण सागतो. गुरुत्व ह्मणजे काय हे तुला बरोबर समजले ह्मणजे असली शका येणार नाही. शब्द-स्पर्शादि विषयांमध्ये जशी आपापल्या इद्रियास आपणाकडे आकर्षण करून वेण्याची शक्ति असते त्याप्रमाणे पृथिव्यादि पदार्थामध्ये आपापल्या अशास आपणाकडे ओढून घेण्याची शक्ति आहे. तिलाच गुरुत्व असे मणतात. फळे, फुले इत्यादि पृथ्वीचे अश आहेत त्यामुळे ते देठावरून निघताच आपल्या मूळ जननीकडे येतात व ती ही त्याना आपल्या- कडे ओढून घेते. तस्मात् गुरुत्वान्या सिद्धीकरिता दिशा मानिल्या पाहि- जेत हे ह्मणणे व्यर्थ आहे. वास्तविक दिशा नसल्यामुळेच अतिशय गुरु । जड ) असलेले हे ब्रह्मांडगोलक खाली पडत नाहीत व त्यांच्या जलादि आवरणाचा आणि त्यांचा वियोग होत नाही. यास्तव अध्यस्त जगातील दिशाची उपपत्ति लागावी ह्मणून अधिष्ठानचैतन्यामध्ये दिशा आहेत, असे मानण्याचे काही कारण नाही. हा आमचा सिद्धात, भूगोलास खगोलाने ( ह्मणजे ज्योतिश्चक्राच्या आधारभूत गोलाने) सर्व बाजूनी वेष्टिले आहे, असे मानणाऱ्या ज्योतिःशास्त्रज्ञासही मान्य