पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ बृहद्योगवासिष्ठसार. पसरली होती. त्यातील प्रत्येक ब्रह्माडास वर सांगितलेली आवरणे होती व अशी कोट्यनुकोटी ब्रह्माडे त्या आकाशांत वाळवटावरील रेतीच्या कणाप्रमाणे अथवा कवडशात तरगणाऱ्या त्रसरेणूप्रमाणे पसरली होती त्या महाकाशसज्ञक महासागरात अविद्या हेच अगाध जल असून त्याच्या महाचिद्रपी द्रवापासून ब्रह्माडरूपी असख्य बुडबुडे उठले आहेत त्यातील काही त्या त्या ब्रह्माडावर अभिमान ठेवणाऱ्या जीवाच्या ज्ञानाप्रमाणे खाली जात आहेत, काही वर येत आहेत; काही तीर्यक (तिरकस ) जात आहेत व कित्येक स्तब्ध आहेत, असे तिला आढ- ळले. ज्याची ज्याची जेथे जेथें जशी जशी प्राक्तन उपासना-सवित ( ज्ञान ) होती त्याचे त्याचे तेथे तेथे त्या त्याप्रमाणे स्वरूप उत्पन्न झाले होते. ( अर्थात् साप्रतकाळी सष्टीत दिसणारी विचित्रता पूर्व ज्ञानकर्मादिकाचे फल आहे व ते सर्व अनुभव घेणाऱ्या जीवाच्या दृष्टीने आहे.) पण वस्तुतः पाहिल्यास त्या चिदाकाशात व या ब्रह्मा- डदेशातही ऊर्ध्व, अधः, तीर्यकु, इत्यादि काही नसते. जाणे, येणे, याही केवळ कल्पना आहेत. ते चित्-तत्त्व या सर्वाहून निराळेच काही आहे. ते काय आहे व कसे आहे, याचे वाणीने वर्णन करवत नाही व मनाने चितन करवत नाही. शास्त्रात देहाच्या उत्पत्तीचे जे वर्णन केलेले असते ते अज्ञानी लोकास समजाविण्याकरिताच केवळ असते. आता तू ह्मणशील की, धर्मीच जर नाही तर उत्पत्ति व नाश या कल्पना कोणत्या अधिष्ठानावर होतात ? तर त्याचे उत्तर सागतो ऐक. आत्म्या- विषयीचे जे स्वाविद्यानामक अज्ञान त्याच्यायोगाने उत्पन्न होणाऱ्या सक- ल्पामुळे सवितच्या अधिष्ठानावर व्यक्त होऊन सकल्पाबरोबरच पदार्थ नाश पावतात. ( नाशपावतात ह्मणजे स्वयप्रकाश सवित्मध्ये जलत- रंग-न्यायाने लीन होतात. त्यामुळे त्याची उत्पत्ति व नाश या दोन्ही कल्पना आहेत.) श्रीराम-पण, महाराज, अधिष्टानभूत ब्रह्मामध्ये जर दिशाचे नाव सुद्धा नाही तर अध्यस्तामध्ये (ह्मणजे आरोपित वस्तूमध्ये ) त्या कशा असणार ? व दिशाचाच जर पत्ता नाही तर अधः, ऊर्च, तीर्यक् इत्यादि व्यवहार, या काल्पनिक जगामध्ये, कसे होणार ? अधिष्ठानात असलेले धर्मच आरोपित वस्तूत येतात, असा नियम नाही का ?