पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ३०. २२७ श्रीवसिष्ठ याप्रमाणे ती बोलत आहे तोच त्या दोघी ब्रह्मांडाच्या वरील शकलास येऊन पोचल्या. पर्वताच्या कड्यावरील दाट मडपात जशा भ्रमरी सहज प्रवेश करितात व पुन. त्यातून बाहेर निघतात त्याप्रमाणे, किंवा अवकाशरूप आकाशात पक्ष्याचा जसा नि प्रतिबंध सचार होतो त्याप्रमाणे त्याही, त्या ब्रह्माडावरणातून सहज बाहर पडल्या. ठीकच आहे. सत्य निश्चयाने युक्त असलेली वस्तु जशी वज्रासारखी दृढ असते तशी मिथ्या वस्तु नसते. असो; जिच्या अनुभवज्ञानास आवरण मुळीच राहिलेले नाही, अशी ती लीला, त्याच्यापुढे, ब्रह्माडाहून दशगुण अधिक जलावरण पाहती झाली. ते फार भयानक होतें. अक्रोडादि फळाना त्याच्यावरील साल जशी आच्छादित करून रहाते त्याप्रमाणे ते ब्रह्माडास सर्वतः वेष्ट्रन राहिले होते. त्या जलावरणाच्या पुढे जलाहून दसपट आधिक वहि; त्याच्या पलीकडे दसपट वायु, वायूच्या पलीकडे वायूहून दसपट अधिक आकाश व त्या आकाशाच्या पाकडे अमर्याद परम शुद्ध चिदाकाश होते. त्या परम आकाशामध्ये उत्पत्ति, स्थिति, नाश इत्यादि कल्पना कधीही उद्भवत नाहीत. किंबहुना वध्यापुत्राच्या इतिहासाप्रमाणे त्याचा तेथे असभवच असतो. ते केवल, अनत, शात, निर्विकल्प, आदि-अत- मध्यरहित व स्वतःच्या स्वरूपात स्वतःच्या आधाराने रहाणारे आहे. त्या शुद्ध चिदाकाशात, एक कल्पभर, एकसारिखी वरून एकादी शिला अति वेगाने जरी पडत राहिली, त्याचा ठाव काढण्याकरिता गरुड जरी कल्पभर उडत राहिला अथवा वायु जरी वहात सुटला तरी त्याचे परिमाण मिळणार नाही. तेव्हा, बा राघवा, ते चिदाकाश किती दृढ अपरिच्छिन्न (अनत) आहे याचा तूच विचार कर २९. सर्ग ३०-वर वर्णन केलेल्या ब्रह्माडासारखी व त्याच्याहून विचित्र अशी अनेक कोटि ब्रह्मा लीलेने चैतन्याकाशात अणु-र'सारखी पाहिली, असे या सात वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ रघुवीरा, याप्रमाणे उत्तरोत्तर दसपट अधिक प्रमाणाची पृथिव्यादि भूताची आवरणे ओलाडून त्या दोघी एका क्षणात पुढे गेल्या. लीलेने तें परमाकाश झणजे अविद्याशबल ब्रह्म पाहिले. त्या माकाशांत वर वर्णिलेल्या ब्रह्मांडासारखींच जगत्संज्ञक असख्य ब्रह्मांडे