पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ-असें बोलून देवीस जिने नमस्कार केला आहे अशी ती लीला मडपात प्रविष्ट झाली व एकाद्या पक्ष्याप्रमाणे देवीसह मडपातर्गत आकाशात उडाली. काजळाच्या दिगाप्रमाणे, निश्चल समुद्राप्रमाणे, नारायणाच्या अगकातीप्रमाणे किंवा भ्रमराच्या पाठीप्रमाणे ते आकाश रमणीय व नीलवर्ण होते. मेघमार्गाचे व वातस्कधाचे उल्लघन करून द्र, सूर्य, नक्षत्रे इत्यादिकाच्या पलीकडे असलेल्या ध्रुवमार्गात त्या पोचल्या. साध्याचे स्थान, सिद्धाची भूमि, स्वर्गमडल, ब्रह्मलोक, तुषिताचा लोक, गोलोक ( वैकुठ ), शिवलोक, पितृलोक आणि विदेहमुक्त व सदेहमुक्त याचे लोक याच्यापुढे फार दूर एका क्षणात गेल्यावर तिला मागे पहावेसे वाटले. आपण किती दूर आलो, हे जाणण्याकरिता ती जो फिरून पहाते तो खाली चद्र, सूये, तारा, भुवने यातील काही दिसत नाही, तर नुस्ता अधकार पसरला आहे, असे तिच्या अनु- भवास आले. तेव्हा- लीला-देवि, खाली सूर्यादि काही दिसत नाही ! ती सर्व तेजे कोटे गेली व हा दाट अधकार कोठून आला ? __ श्रीदेवी-लीले, तू एका क्षणार्धात इतकी दूर आली आहेस की, सूर्यादि तेजोगोलही दिसत नाहीत ज्याप्रमाणे अतिशय खोल विहिरीत अगदी तळाशी असलेला काजवा दिसत नाही त्याप्रमाणे या महा-आका- शांत सूर्याच्या अतिशय पलीकडे गलेल्या तुला सूर्य दिसत नाही. लीला-अहाहा ! देवि, आह्मी आकाशात इतक्या दूर आलो आहो काय की, जेथून अनेक योजने विस्तीर्ण असलेला भगवान् भास्कर आह्मास खाली अणु-रणु एवढाही दिसत नाही ! माते, आता यापुढील मार्ग कसा काय आहे, व त्यातून आलास कसे जावे लागणार ? ते साग, कारण तो मागच्या मार्गाहून निराळ्या प्रकारचा असावा, अमे मला वाटते. श्रीदेवी-वत्से. यापुढे तुला ब्रह्माडसज्ञक सपुटाचे वरचें शकल दिसेल. चद्र-सूर्यादि हे सर्व त्याच्याच धुळीचे अश आहेत. (ह्मणजे पृथ्वीच्या मानाने जेवढा धुळीचा एक कण तेवढेही त्या सपुटाच्या मानाने ते नाहीत.)