पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २९. २२५ भोपळे लागले आहेत. या भूलोकचे प्रत्यक्ष बधच, असे हे आमचे बाधव जाळण्याकरिता वाळलेली लाकडे आणीत आहेत. रडून रडून त्याचे डोळे लाल झाले आहेत व त्याच्या दंडात रुद्राक्षाच्या माळा आहेत. टवट- वीत व हिरव्या पानानी सुशोभित झालेले वृक्ष ज्याच्या तीरी रागेंने उभे आहेत, असा सगळ्या ग्रामातील लोकाच्या उपयोगी पडणारा हा मोठा पाण्याचा पाट या गृहमडपास परिवष्टित करीत आहे. त्याच्या काठावरील कोवळे गवत व वेली, वेगाने वाहणाऱ्या त्याच्या पाण्याच्या शितोड्यानी सदा भिजलेल्या असतात. पलाशादि वृक्ष प्रफुल्लित झालेले असून त्याचे पाटाच्या प्रवाहात पडलेले प्रतिबिब विद्रुम-रत्नजडित अलकाराचे स्मरण करवीत आहे. पाटाच्या पाण्यातून वहात जाणारी आम्रादि फळे धरण्याकरिता पोराची कशी धादल झाली आहे, पहा ! अहाहा देवि, किती रमणीय स्थान आहे हे ! येथील गार छायेचा उपभोग घ्यावयास मिळणे हे काही सामान्य भाग्याचे चिह्न नव्हे. असो, वर्णनीय वस्तूचे वर्णन कितीही जरी केले तरी ते थोडेच होते. येथे माझा पति वस्तुतः अक्रिय असूनही जीवाकाश झाल्यामुळे भूपति बनून चतुःसमुद्र-वलयाकित पृथ्वीचे राज्य करीत होता. बरोबर, आता मला आठवले. “ मी लवकर राजा व्हावे " अशी त्याला पूर्वी इच्छा झाली होती. शेवटी शेवटी तर त्याला त्याचाच ध्यास लागला होता. त्या दृढ-भावनेमुळे, हे परमेश्वरि, आठ दिवसात दीर्घकाल राज्योपभोगाचा अनुभव देणारे राज्य त्यास प्राप्त झाले. आता येथे माझ्या पतीचा हा जीव राजा झाला आहे. आकाशातील वायूप्रमाणे किवा वायूतील सुवासाप्रमाणे तो अदृश्य आहे. पण त्याचे ते अनेक योजने विस्तीर्ण असलेले स्थान या अंगुष्ठमात्र आकाशातच आहे, त्याच्या बाहेर नाही, हे मला समजलें. ईश्वरि, माझी दोघे चिदा- काशच आहो व माझ्या पतचे राज्यही चिदाकाशच आहे. पण असे असूनही पर्वत, नद्या, वृक्ष, प्राणी इत्यादि सहस्रावधि भिन्न भिन्न पदार्थानी भरलेले हे जग भासते. परंतु ती माया परसली आहे. यास्तव हे देवि, पुनरपि पतीच्या नगरास जावे, असे मला वाटते. तर चल. आपण आता तेथे जाऊ. ते स्थान येथून जरी दूर असले, तरी उद्योग्याना दूर किवा असाध्य काय आहे ?