पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ बृहद्योगवासिष्ठसार. लाच तो झाडून दारात सडा व रागोळ्या मी घालीत असे. गृहातील पुत्र, स्नुपा इत्यादिकाना रीत लागावी ह्मणून मी त्यास नेहमी बोलत असे. अमुक अमुक ह्मणतो की, त्या अमक्याचा पुत्र चागला नाही; लबाड आहे, चोर आहे, त्याची सून उद्धट आहे, भाडखोर आहे, इत्यादि खरे- खोटे सागून मी त्यास नीतीचे शिक्षण देत असे ( या शिक्षणाचेच पढे जाचात कसें पर्यवसान होते व त्यामुळेच आमच्या कित्येक मूर्ख व दुष्ट सासूच्या हाताखाली वागणाऱ्या सुनाचे कसे जन्माचे मातेरे होते, ते प्रसिद्धच आहे.) मी आपली मयोटा कवी सोडत नसे. शेवटी मला जरा आली. माझ्या अगाचा वर्ण पिकलेल्या पानासारिखा झाला. माझे कान बहिरे झाले, डोळ्यानी दिसेनासे झाल. मस्तक कापू लागले, हातात काठी घेतल्यावाचून एक पाऊलही टाकवेना. पाठीस पोक आले. दातानी तर कधीच प्रयाण केले होते. त्यामुळे तोडातून लाळ पडत असे. पण इतके सर्व झाले तरी " हे माझे " ही भावना जशीच्या तशीच किबहुना अधिक बळकट होती. मी मरू नये, आणखी काही दिवस जीवत असावे ही आशा काही केल्या कमी होईना. असो, असे बोलत त्या गिरिग्रा- माच्या आकाशातून फिरणाऱ्या लीलेने आपल्या बरोबर फिरणाऱ्या सर- स्वतीस बोटाने मोठ्या आश्चर्याने दाग्ववून म्हटले-देवि, ही पहा एकसारखी लाल पुष्पानी भूपित झालेली माझी पुष्पवाटिका. ही फुललेल्या अशोकानी यक्त असलेली अशोकवाटिका. ही पहा माझी पुष्करिणी. तिच्या काठी ती पहा लहान लहान वासरे सैल बाधलेली आहेत. तिच्या तीरावर सदर वृक्ष कसे लाविले आहेत ते तू पाहिलेस ना ? त्याच्यावर वेली कशा चढल्या आहेत ? अरेरे। ही कणिका नावाची वेल जणु काय माझ्या वियोगा- मुळेच सुकून गेली आहे. तिन्यावर एकही पान राहिलेले नाही. ही ती बिचारी माझी पाणी आणून देणारी दासी, माझ्या करिता आज आट दिवस रडून रडून तिचे डोळे सुजले आहेत. देवि, मी येथे भोजन करीत होते, येथे रहात होते. येथे निजत होत्ये. येथे बसून देवघेव करीत होते व या ठिकाणी मी दाने देत होते. हा पहा माझा ज्येष्ठशर्मा नामक पुत्र माझ्या करिता रडत आहे. ती पहा माझी दुभती गाय आगरात कोवळे गवत खात आहे. माझ्या घराचे हे पुढचे दार पहा. तो पहा माझ्या स्वयपाक गृहावर चढलेला भोपळीचा वेल. त्याच्यावर किती तरी