पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ बृहद्योगवासिष्ठसार. त्यातील पुण्यवानांकडेच गेल्यामुळे त्यास तसले लोक फारसे आढळ नाहीत. त्या गावाच्या सभोवती उपवनें होती. कित्येक धार्मिकान आपल्या गृहाजवळच काही उपयोगी वृक्ष व पुष्पलता लाविल्या होत्या त्याची पुष्पे, पाने व फळे त्याच्या धार्मिक कर्माच्या फार उपयोगी पडत असत. साराश तेथील धार्मिक धर्माचरण करीत होते; श्रीमान् विलार भोगीत होते; दरिद्री व रोगी कष्टकर आयुष्य कसे तरी घालवीत होते, सेवर सेवाकर्म करीत होते; धनी त्यांच्या कडून तें करवीत होते व येणेप्रमाणे त्य ग्रामात सर्व व्यवहार चालला होता. वापी, कूप, तडाग इत्यादिकाचीही ते कमतरता नव्हती. प्रातःकाल, मध्याहसमय, सायकाल, रात्रीचा पूर्वभाग इत्यादि समयी कोणत्याही ग्रामात सामान्यतः जशा सर्व क्रिया घडतात तशाच तेथेही होत होत्या. त्यांतील मोठमोठी मदिरे खरोखर प्रेक्षणीय होती त्या सर्वाचे वर्णन करूं लागल्यास एक मोठा प्रथच होईल यास्तव, एकाद्या अतिशय सुखी, विस्तृत, उद्योगधद्यांनी व सर्व प्रकारच्या वैचित्र्यानी भर- लेल्या रमणीय नगराप्रमाणे तो गिरिमाम होता, असे तू समज २८. सर्ग २२-या सर्गात लीलेला तिच्या मागच्या चरित्राची आठवण झाली व लोकाच्या समूहानी भूषित झालेल्या आकाशात त्या परत गेल्या, असे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ट्र--राघवा, अगोदर दुरूनच त्या गिरियामाची शोभा पाइन त्या दोघी दिव्य स्त्रिया, शम–दमादि साधनसपन्न व तत्त्वज्ञ पुरुषामध्ये भोगश्री व मोक्षश्री जशा प्रवेश करितात त्याप्रमाणे, त्या शात ग्रामात प्रवेश करित्या झाल्या. लीलेला समाधि लावून बराच काल झाला होता. त्यामुळे तिचे ज्ञान अति शुद्ध होऊन ती स्वतः शुद्धज्ञानरूप व त्रिकालदर्शी झाली. तिला पूर्वजन्मातील सर्व व्यवहारांचे व जन्ममरणादि अवस्थाचे स्मरण आपोआप झाले व ती देवीस प्रणाली-देवि, तुझ्या प्रसादामुळे हा प्रदेश पाहून मला येथील मागच्या व्यवहाराची आठवण झाली. मी येथे पर्वी, वृद्ध, जिच्या अगास सुरकुत्या पडल्या आहेत, जिच्या अगातील शिरा स्पष्ट दिसत आहेत आणि जिचे तळ हात दर्भाच्या अग्राच्या क्षतानी रूक्ष झाले आहेत अशी कृश व कृष्णवर्ण ब्राह्मणी होते. मी आपल्या पतीचे कुल घाढविले. मी येथे असताना प्रत्यही प्रातःकाली दही घुसळीत असे. मला पुष्कळ पुत्र होते. अतिथींना मी फार