पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २८. २२१ जग दिसते. मरुभूमीवर जसे जल भासते, सुवर्णाचे ठायी जसे कडे भासते, त्याप्रमाणे आत्म्याचे ठायी हे असत् दृश्य सत् असल्यासरखे भासते. ___ असो: आता त्याच्या पुढे काय झाले ते ऐक. वर सागितल्या- प्रमाणे परस्पर भाषण करीत त्या दोघी सुदर स्त्रिया त्या ब्राह्मणाच्या गृहा- तून बाहेर पडल्या व त्या गावातील कोणीही आपणास पाहू नये, या हेतूने गुप्त राहूनच त्या दोघीजणी त्या अवाढव्य पर्वताचे निरीक्षण करू लागल्या. त्या पर्वताचे शिखर अतरिक्षाच्या मध्यभागी जाऊन पोचले होते. तो पर्वत सूर्यासच स्पर्श करीत आहे की काय, असा त्यास भास झाला. अनेक रगी बेरगी वृक्षादिकामुळे चित्र विचित्र झालेल्या वनाच्या योगाने तो फार रमणीय दिसत होता. त्याच्या वरून अनेक नद्या मोठ्या वेगाने वहात खाली जात होत्या. पण ज्याच्या जवळ थोडे ज्ञान असते तो ज्ञानाच्या गोष्ठी फार सागतो, हे सुचविण्याकरिताच जणु काय त्या मोठमोठ्याने ध्वनि करीत होत्या. पण जल फारसे नसताना उगीच मोठा ध्वनि करणाऱ्या त्यास भ्यालेले पक्षी नाना प्रकारचे शब्द करीत स्या पर्वतावरील वृक्षावर इतस्ततः पळत होते. तथापि त्यात जे शहाणे (पक्षी) होते ते एकाद्या गभीर व शात धार्मिक माहात्म्याप्रमाणे, याच्या या व्यर्थ ओरडीला कोण भिते, असे समजून आपल्या मधुर ध्वनीने आपल्या चित्ताचे व प्रेमाने आणि आदराने ऐकणाऱ्याच्या चित्ताचे रजन करीत होते. त्या पर्वतावरील वृक्षाच्या मजिऱ्या मेघमडलास चित्रविचित्र करीत होत्या व शुद्ध अकाशातही त्या वेठीवरून वसलेले पक्षी दिसत होते. त्या पर्वतावरील नद्याच्या तीरास, त्यावर वाढलेले बळकट वेत, आधारच देत आहेत व तो त्यानी दिल्यामळेच ते उभे आहेत, असें त्यास वाटले. असो, अशा प्रकारच्या त्या अवाढव्य पर्वतावर वसलेला तो ग्रामही त्यास दिसला. आकाशातून तो एक स्वगोचा तुकडाच खाली पडला आहे, असा त्यास भास झाला. कारण तो फार समृद्ध होता. चारी वर्णाचे लोक त्यात आपापल्या धर्माचरणाने रहात होते. पशू, पक्षी, इत्यादिकाचीही त्यात न्यूनता नव्हती. मोठमोठे मार्ग सर्वदा वहात होते. गायीची सेवा सर्व लोक मोठ्या आनदाने व आस्थेने करीत होते. त्यांत आपापल्या पूर्व कर्माची फळे भोगणारे दरिद्री व रोगी स्त्री-पुरुष मुळीच नन्हते, असें नाही. त्याचीही तेथें समृद्धि होती. पण त्या देवीचे सर्व लक्ष