पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवासिष्ठ-( हसून ) रामा, कोटले ब्रह्माड, कोठली भिंत व को- ठली तिची दृढता ? त्या देवी, त्या अत पुरातच होत्या. त्याच गिरि- ग्रामातील त्याच गृहाकाशात तो वसिष्ठ ब्राह्मण साप्रत राजत्वाचा अनुभव घेत आहे. त्या मडपाकाशाच्या केवल शून्यरूप अशा एका कोपऱ्यातच पद्मराजास चतु:समुद्र-वलयाकित पृथ्वीचा अनुभव आला. त्या आकाशरूपामध्येच भूपीठाचा प्रादुर्भाव झाला, भूपीठाचे ठायी राजाचे नगर भासले व त्यात त्यास व त्याच्या राणीस ( ह्मणजे लीलेस ) त्याचे राजगृह भासले वसिष्ठ ब्राह्मणाची अम्धती नामक स्त्रीच पद्माची लीला- नामक राणी झाली. तिने ज्ञप्ति देवीची पूजा केली पुढे त्या ज्ञप्तीबरोबर तिने आश्चयानी मनोहर झालेल्या आकाशाचे उल्लघन करून दुसरे ब्रह्माट पाहिले पण ते ब्रह्माड त्या गिरिग्रामातील मदिरातच होते व तिने जे काही पाहिल तेही हृदयातील टीचभर आकाशात राहूनच पाहिले आणि पुनरपि त्या ब्रह्माडातन परत येऊन ती आपल्या घरी राहिली. ह्मणजे हातरुणावर निजलेला परुष एका म्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात जाऊन जसा पुन परत यावा त्याप्रमाणेच लीलेचे हे जाणे व येणे होते ते सर्व केवल प्रतिभास व केवल आकाश हात वस्तुत ब्रह्माड नाही, ससार नाही, भीत नाही व दृरता नाही त्या दोघीचे चित्तच तसे तसे विकार पावले. केवल वासनेमुळे त्याना त्या त्या वस्तूचा भास झाला. त्यानी आपल्या चित्ताने अनत चिदाकाशाच्या स्वत्प भागासच " हे ब्रह्माड " असे कल्पिले. ह्मणजे महाकाशच स्पदामुळे जसे वायुरूप होते तसाच हा सर्व प्रकार झाला चिदाकाश जन्मरहित व शात आहे ते सदा सर्वत्र असते. पण ज्याला त्याचे ज्ञान नसते अशा पुरुषाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये चित्त्व हा धर्म येतो व त्यामुळे ते आपणच आपल्यामध्ये जगत् पहाते. पण ज्याने त्यास जाणले आहे त्यास ते आकाशाहूनही शून्य वाटते. मग असे जर आहे तर सर्वच प्राणी या ब्रह्माडरूप भितीचे उल्लघन करून का जात नाहीत ? ह्मणून विचारशील तर सागतो. ज्याला हे तत्त्व समजलेले नसते त्याच्या दृष्टीने हे ब्रह्माड वज्राच्या पर्वताप्रमाणे कठिण असते. स्वप्नामध्ये लहानशा गृहातच जसे लाखो मनुष्यानी गजबजलेलें नगर दिसते त्याप्रमाणे या चैतन्यमात्र तत्त्वामध्ये हे असत् पण अवाढव्य