पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २८. २१९ थोडीशी तडफड करून राम मटलें. पुढे मी पुलिद जातीची नीच स्त्री झाले. सुस्वर गायन करून मी वनात इकडे तिकडे फिरत असे; तान लागली झणजे चर्मण्वती नदीचे जल पीत असे व पतीशी सुरतसुखानुभव घेऊन थकवा आला ह्मणजे तो घालविण्याकरितां माडी पीत असे. पढ़ें मी सारसी झाले व आपल्या रमणीय सारस पक्ष्यास उपभोगाने रिझवू लागले. त्यानतर पुनः मानुषी झाले. तेथे काही पुण्यसचय केल्यामुळे व पूर्व पुण्याचाही त्याचवेळी उदय झाल्यामुळे मी अप्सरा होऊन देवाच्या उपयोगी पडू लागले. त्या जन्मीं नदनवनात मी जे जे उपभोग घेतले आहेत व जे जे विलास केले आहेत त्या सर्वाचे वर्णन करिता येणेही अशक्य आहे. पुढे मी कच्छपी ( कासवीण ) झाले. त्यानतर राज- हसी बनले. तेथे वाऱ्याने हालणान्या सावरीच्या पानावर बसलेला मश- काचा समूह मी पाहिला. त्यातील एक मशक खाली पडले. पण त्यास पुन वर येता येईना. ते पाहून माझे मन द्रवले. त्या सस्कारामुळे मलाही उत्तर जन्मी मशक व्हावे लागले कारण मरणसमयींही मला त्याचेच स्मरण झाले. पुढे मी वेत होऊन पुष्कळ दिवस नदीच्या तीरी एकाद्या तपस्व्याप्रमाणे राहिले. पुढे मी विद्याधरी झाल्ये. माझ्या शरीरकातीकडे पाहून कामसतप्त झालेले तरुण विद्याधर अनेकदा माझ्या पाया पडत असत. पण तेथेही मला प्रिय-वियोगाचे असह्य दुःख अनुभवावे लागले. मुदर शय्येवर मला अनेक रात्री तडफडत व दीर्घ श्वास सोडीत पडावें लागे. साराश याप्रमाणे मी रहाटगाडग्याच्या मोघ्याप्रमाणे किवा तागडीच्या दाडीप्रमाणे खाली, वर, पुनः खाली, पुनः वर, अशा अनेक फेऱ्या केल्या. त्यामुळे माझे चित्त अतिशय व्याकुळ झाले. या ससारसज्ञक दीर्घनदीतील मी एक लाटच होऊन राहिल्ये. अथवा जसा वारा वाहील त्याप्रमाणे वनातील उच्चनीच प्रदेशी भटकणाऱ्या वातहरणीप्रमाणे माझी स्थिति झाली २७. सर्ग २८-या सर्गात दृष्टप्रपंच मिथ्या असल्यामुळे चिदाकाश सत्य आहे, असे सागून पर्वत व गिरिप्राम याचे विस्तृत वर्णन केले आहे. श्रीराम-अति दृढ व अनेक योजनें दीर्घ अशा त्या ब्रह्मांडरूपी भिंतीचे त्यांनी कसे उल्लघन केले. कारण स्वप्नातील मिथ्या भिंतही स्वप्न असे पर्यंत प्राण्याच्या गतीस निरोध करीत असते.