पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ बृहद्योगवासिष्टसार. झाले. पण दैवयोगाने मला तेथे एका महा तपस्याचा समागम झाला. काही दिवसानी त्या उपवनास वणवा ( आग) लागला व त्यात मी जळून गेले. पण त्या मुनीच्या समागमाने मी पवित्र होऊन त्याचीच कन्या झाले. तेथे माझ्या हातून अनेक पुण्य कर्मे झाली व त्यामुळे मी स्त्रीजन्मांतून मुक्त झाले. पुढच्या जन्मी मी एका उत्तम देशाचा श्रीमान् राजा झाले. पण वैभव, तारुण्य, रूप व अज्ञान याच्या अति- रेकामुळे माझ्या हातून त्या जन्मी अनेक दुष्कृत्ये घडली. त्याचे फल भोगण्याकरिता मी पुनः तिर्यक् योनीत गेले. मी नऊ वर्षे मुगुस (स्त्री) झाले. त्यानतर आठ वर्षे मी रोगी व सडक्या अगाची गाय झाले. त्या जन्मात मला फार कष्ट भोगावे लागले. दुष्ट, अज्ञ व अधार्मिक गोपालाचे बालक मला ताडण करीत व एकसारखे माझ्या मागे लागत असत. पुढे मी पक्षीण झाले. पण एकदा, पक्ष्याशी निष्कारण वैर कर- णाऱ्या व्याधाच्या पाशा( जाळ्या )त मी सापडले. यमाच्या पाशाप्र- माणे त्या पाशातून मुटणेही अशक्यच होते. पण शरीरावरील अध्यास मला त्या पाशातही स्वस्थ बस देईना. मी आपल्या शक्तीप्रमाणे पुष्कळ धडपड व फंडफड केली. पण दुदेवी पुरुषाच्या प्रयत्नाप्रमाणे ती सर्व व्यर्थ गेली व शरीरास श्रम मात्र झाले. शेवटी माझा अतकाळ जवळ आल्या- कारणाने त्या निर्दय व्याधाने माझी मानगुटी धरली व माझा गळा चिरिला. त्यानतर मी भ्रमरी झाले पुढे हरिण झाले. आपल्या प्रिय पतीसह वनात फिरत असताना मला एका किराताने पाहिले. मग काय विचारता | तो दुष्ट माझ्या मागे लागला. जीव वाचविण्याकरिता मी आपली होती तितकी शिकस्त करून पाहिली पण व्यर्थ. मृत्यूपुढे कोण कितीसा पळणार ? शेवटी त्या मनुष्यरूपी यमाने एका बाणानेच माझे ते रमणीय शरीर भूमीवर लोळविले. पुढच्या जन्मी मी मत्स्यी झाले. समुद्राच्या लाटाबरोबर मी कोठे तरी वहात जात असे. आज येथे तर उद्या आणखी दहा कोसावर. एक स्थान नाही, एकाचा समा- गम नाही व एकच भक्ष्य नाही. पूर्ण विरक्त सन्याशाप्रमाणेच माझी त्यावेळी अवस्था होती. पण तेथेही मत्यूने मला फार दिवस राहू दिले नाही. मी खाण्याच्या लोभात गुतून कोळ्याच्या ग- ळास आपली मान अडकविली व त्याने जलातून वर काढताच