पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २७. २१७ क्यातून पडलेल्या कवडशामध्ये ) जसे असख्य त्रसरेणु (परमाणूसारखे तरगत असलेले कण) असतात त्याप्रमाणे या महा चैतन्याच्या एकेका अत्यत अत्यत-मूक्ष्म अशामध्ये मसारसमूह सहज रहातो. तुला प्रत्यक्ष दाखविलेल्या या ब्रह्माडाप्रमाणेच जरी ही दुसरी सर्व ब्रह्माडे अनेक समद्र, हीपे, पर्वत, चतुर्दश भुवने इत्यादि मोठमोठ्या पदार्थाच्या योगाने फार मोठी झाली आहेत तरी या चैतन्याशी त्याची तुलना करून पाहू लागल असता त्यातील प्रत्येक ब्रह्माड वडाच्या लाल फळातील अगदी सूक्ष्म बीजा एवढेही आहेसे वाटत नाही. अतरिक्षात नानाप्रकारच्या रत्नाची प्रति- विबे पाडिली असता जसा तेथे वनाचा भास होतो त्याप्रमाणे अविद्या- प्रयुक्त दृढवासनेमुळे, वस्तुत. पृथ्यादि-भूतरहित चैतन्य, जगद्रप भासते. ज्ञतिच, "हे जग" असा भाव, आपल्या स्वरूपात धारण करिते. पण नातीने तसे जरी भासत असले तरी ब्रह्मसज्ञक परमार्थ वस्तूमध्ये मुळीच कधी काही झालेले नाही. ज्याप्रमाणे सरोवरात तरग पुनः पुन. उठ- तात व लीन होतात त्याप्रमाणे या महा चतन्यामध्ये विचित्र आकार, दिन-रात्र, पक्ष, मास इत्यादि कालाची अगे व ब्रह्माडाटि देश वारवार होऊन लय पावतात. लीला--जगज्जननि, तू मागतेस ते अगदी बरोबर आहे. मला आता सर्व आठवले मनुष्यजन्म रजोगुणाचे फल आहे यास्तव माझा हा जन्म राजस आहे. तामस किवा सात्त्विक नव्हे. या कल्पाच्या आरभी हिरण्यगर्भापासून अत करण-उपाधि उत्पन्न झाल्यामुळे त्यात प्रतिबिब रूपाने अवतीर्ण झालेल्या माझे आजपर्यत आठशे जन्म झाले. मी अनेक योनीचा अनुभव घेतलेला असून त्या सर्वास मी या वेळी जणु काय पुनः प्रत्यक्ष पहात आहे. देवि, मी विद्याधराच्या लोकी एका श्रेष्ठ विद्याधराची स्त्री होऊन पूर्वी एका ससार-मडलात रहात होते नतर दुर्वासनेने कलुषित होऊन मी दुसऱ्या ससार- मंडलात मानुपी झाले. त्यानतर नागराजाची पत्नी झाले व कदब, कुद, जबीर, करंज इत्यादिकाच्या वनात राहू लागले. त्यानतर मी दुगणास पाने गुडाळून लज्जा रक्षण करून घेणारी काळीकुट्ट शबरी झाले आणि अरण्यवासामुळे मी मूर्ख व उद्धट बनले. त्या उद्धटप- णामुळे मला स्थावर-योनीत जावे लागले. मी एका तपोवनात पुष्पलता