पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ बृहद्योगवासिष्ठसार. भसख्य पतीची शरीरे या आकाशात आहेत व त्यानी अनेक भूतले च्यापिली आहेत. तेव्हा त्यातील तुला कोणतें दाखवू , ते साग. (ह्मणजे ब्राह्मण, पद्म व त्याचा जीव यातील एकाद्याचे शरीर पहावे, असे तुला वाटते की, त्याच्या मागील-पुढील पतीच्या शरीरातील एकादे पहाण्याची तुझी इच्छा आहे ? ) जवळच्या या तिघातील ब्राह्मण शरीराचे भस्म झाले आहे. रमाचे शरीर अतःपुरातील पुष्पान्या टिगाखाली शवरूपाने राहिले आहे व त्याच्या जीवाचे नवे शरीर या ससार मडलात राजा झाले आहे. तो मोठ्या मसार-सागरात पडून त्यातील भोवऱ्यात गरगर फिरत आहे भागरूपी लाटामध्ये सापडून व्याकुळ होत आहे. त्यामुळे त्याची बुद्धि मलिन झाली आहे. बुद्धीच्या कालुष्यामुळे त्यात प्रतिबिबित झालेले चैतन्यही जाड्याने शिथिल झाले आहे. नाना प्रकारची विचित्र व अतिकठिण राजकार्य करीत असूनही तो जडतेमुळे ससार-भ्रमात निजन राहिला आहे तो त्यातून मुळीच जागा होत नाही उलट मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, मी सिद्ध आहे, मी बलवान आहे, मी मुग्वी आहे, असे तो बरळत असतो पण त्याच सकल्परज्जून्या योगाने आपण अधिकाधिक बावले जात आहो, ह त्याच्या ध्यानात येत नाही. तापय ता अविद्या-परतत्र झाला आहे. यास्तव, हे मुदरि, वान्या ( वावटळ ) जशी एका उपवनातील मनोहर गधास दसरीकडे क्षणार्धात नेते न्या- प्रमाणे मी तुला कोणत्या पतीकडे नेऊ ते साग कारण, वत्से, ता अन्य ससार व अन्य ब्रह्माडमडप आहे ह्या मर्व व्यवहार-परपरा निरनिराळ्या पसरल्या आहेत. या मडपाकाशात ही ससार-मडले अगदी आपल्या जवळ ( बाजूस ) आहेत, असे जरी वाटले तरी त्यात अनेक कोटी योजने अंतर आहे. (पति, स्त्री, पुत्र इत्यादि ससारातील माणमाची शरीरे अगदी जवळ जवळ असतात पण पतीस पत्नीच्या व पुत्राच्या शरीरात, पत्नीस पतीच्या व पत्राच्या शरीरात आणि पत्रास त्याच्या शरीरात जावयाचे झाल्यास ते किति कठिण आहे, याची कल्पना करावी. म्हणजे देवीचे हे भाषण चागले लक्षात येईल.) पारमार्थिक दृष्टीने जर तू पाहिलेस तर या सर्व ससार-मडलाचे पारमार्थिक स्वरूप हे मडपात असलेले चिदाकाशच आहे, असे तुला समजेल. त्या मडलामध्ये कोट्य- वधि मेरु व मदार पर्वत राहिले आहेत. सूर्याच्या किरणामध्ये (झरो-