पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २७. २१५ लीला-देवि, माझ्या मृत पतीचा जीव जेथें राज्य करीत आहे त्या नूतन राज्यात मी पूर्वी गेले होते. पण तेथे मला कोणी पाहिले नाही व या सृष्टीत सर्वानी पाहिले, याचे कारण काय? ___ श्रीदेवी--वत्से, त्यावेळी तुला अभ्यासाचे बळ नव्हते. त्यामुळे तुझा द्वैताविषयींचा निश्चय नाहीसा झाला नव्हता. अद्वैत तत्त्वामध्ये भेद पाड- णा-या अविद्येचा उच्छेद होऊन द्वैतसंकल्प जोपर्यत अद्वैतरूप झालेला नसतो तोपर्यत सत्यसकल्पत्वादि अद्वैत कमें कशी होणार ? त्यावेळी लीलचा देहच मी आहे, असा तुझा दृढनिश्चय होता. त्यामुळे तुला सत्यसकल्पत्वाची प्राप्ति झालेली नव्हती. आतां तो निश्चय समूल नाहीसा झाल्यामुळे तू सत्यसंकल्प झाली आहेस. त्याच्याच प्रभावाने ' मला हा ज्येष्ठशर्मा पाहू दे,' असे तुझ्या मनात येताच त्याने तुला पाहिले. आता जर तू आपल्या पतीच्या जीवाच्या त्या नव्या राज्यात गेलीस व 'मला हे पहोत' असा सकल्प केलास तर तुझा त्याच्याशी पूर्वीप्रमाणेच व्यवहार होईल. लीला--जननि, या प्रत्यक्ष दर्शनाच्या योगाने व तुझ्या उपदेशाने मला जे पूर्वी ' असे कसे सभवेल' ह्मणून वाटत होते ते आता वाटेनासे झाले आहे. मला आता त्याविषयीं शका मुळीच राहिलेली नाही. याच मदिराकाशात माझा पति ब्राह्मण होता. यातच तो मरून पद्मसंज्ञक राजा झाला. याच आकाशातील त्याच्या संसारामध्ये त्या भूमडलातील प्रसिद्ध राजधानीत मी त्याची राणी होते. यातीलच त्या अंतःपुरांत तो मरण पावला व याच आकाशातील त्या अत पुराकाशात तो पुनः भूपाल झाला तात्पर्य सर्व वस्तूचे आधिष्ठानभूत जे पारमार्थिक व कूटस्थ (निर्विकार ) ब्रह्म त्याच्या ठायीं हा सवे विकार कल्पित आहे. वर सागितल्याप्रमाणे खरोखरच तो या मडपाकाशात राहिलेला आहे एकाद्या करड्यामध्ये जसे मोहरीचे अनेक दाणे असावेत त्याप्रमाणे याच गृहा- काशात सर्व ब्रह्मांडभूमी आहेत. माझ्या पतीचे ते मडळ सदा माझ्या अगदी जवळच आहे, असे मला वाटते. पण वस्तुतः ते एका बाजूस असावे, असे माझें अनुमान आहे. करिता, हे देवि, ते मला समोर दिसेल असे कर. श्रीदेवी-( हंसून ) लीले, या मडपाकाशात तुझ्या पतीची तीनच मंडले ( शरीरे ) आहेत, असें तू समजू नकोस. तर मागच्या व पुढच्या