पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ बृहद्योगवासिष्टसार. श्रीवसिष्ठ-रामा, वर सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठशावर अनुग्रह करून त्या दोघी दिव्य स्त्रिया त्या ब्राह्मणाच्या गृहांतील मंडपाकाशांत जेथे होत्या तथेच गुप्त झाल्या. तो चमत्कार पाहून आम्हांवर वनदेवींनी मोठी कृपा केली, असे समजून तेथील आबाल-स्त्रीपुरुषानी शोकाचा त्याग केला, चित्त शात केले व ती सर्वजणे आपापल्या गृह-कृत्यांत निमग्न झाली. (लीलेच्या नूतन सर्गाप्रमाणे ब्राह्मणास मरून जरी अनेक वर्षे झाली होती तरी मागे देवीने सागितल्याप्रमाणे त्या दापत्यांस मरून यावेळी आठच दिवस झाले होते. त्यामुळे लीलेला तेथील सर्वाचे दुःख ताजेच होते, असा अनुभव आला व तिच्या अनुग्रहामुळे शात चित्त होऊन गहस्वा- मीच्या मरणानतर एक आठवड्याने ते सवे पुनरपि आपापल्या धद्यास लागले.) नतर इतर जनाच्या दृष्टीने अतर्धान पावलेल्या व आश्चर्याने स्तब्ध झालेल्या आकाशरूपी लीलस आकाशरूपी देवी असे म्हणाली.. श्रीराम---पण गुरुराज, त्या दोघीचे देह साकल्पिक होतेना? मग त्या साकल्पिक वस्तूचे त्या दोघीस परस्पर ज्ञान कसे झाले ? व त्या एकमेकीशी कशा बोलू लगाल्या ? मी आपल्या सकल्पाने एकादा आकार बनविल्यास त्याचे दुसऱ्या कोणास ज्ञान होत नाही व दुसऱ्याच्या साकल्पिक आकाराचे मला कधी ज्ञान होत नाही ! श्रीवसिष्ठ-व्यवहारामध्ये सर्वदाच असे होत नाही, हे खरे, पण ज्याच्यावर देवताचा अनुग्रह होतो त्या दोघाचा स्वप्नामध्ये परस्पर सवाद होतो व तो खराही ठरतो. पुराणात उषा व अनिरुद्ध याच्या स्वप्नातील सभाषणाचे वर्णन आहे व तेच पुढे सत्य ठरले आहे. लोकिकातही उत्तम भक्तास स्वप्नात अनेकदा साक्षात्कार होतात व ते पुढे खरे ठरतात, असेंही आपण पहातो. त्याप्रमाणेच समानसकल्पामुळे त्याचा परस्पर वार्तालाप होणे अगदीच अशक्य नाही. शिवाय त्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य आलेले असल्यामुळे स्थूल देह, इद्रिये, इत्यादिकाच्या सहायावाचून स्वमाप्रमाणे त्या सभाषणादि करू शकल्या. असो; श्रीदेवी---लीले, तुला जे समजावयास पाहिजे होते ते समजले आहे व जे पहावयाचे होते त्याचेही तुला दर्शन झाले आहे. अशाप्रकारची ही ब्रह्मसत्ता आहे. आता आणखी तुला काही सशय राहिला आहे का ?