पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २७. २१३ भयकर अरण्य अथवा शून्य स्थळ भासते. स्वप्नातील मिथ्या स्त्रिया पाद-सवाहनादि सर्व क्रिया बरोबर करितात, असा अनुभव येतो; सारांश प्राण्याच्या चित्ताप्रमाणे वस्तु भासतात. जी सत्य असते ती असत्य वाटते व जी असत्य असते ती सत्य आहे, असा त्यास भ्रम होतो. आकाशात " तो पहा पर्वत, हा पहा हत्ती" इत्यादि जी जी कल्पना अज्ञ करितो त्या त्या प्रमाणे त्याला तेथे आकार भासू लागतात. मूछेत परलोकही प्रत्यक्ष अनुभवास येतो भ्यालेले लोक, मत्त झालेले लोक, अर्धे निद्रित व अर्धे जाग्रत् लोक व नौकेत बसलेले उतारु प्रायः वस्तु- स्थितीच्या उलट प्रकार पहात असतात. त्याच्या वासनेप्रमाणे व दृढ अभ्यासाप्रमाणे त्यास अनेक आकार भासतात. परमार्थत एक वस्तु मळीच नाही, असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. पण लीलेला पृथ्वी इन्यादि वस्तु सत्य नाहीत, अज्ञानामुळे चिदाकाशच त्या त्या आकाराने भासत, असे साक्षात् ज्ञान झाले होते. ज्याला सर्व ब्रह्ममय दिसू लागले आहे, त्या मुनिवर्यास हा माझा पुत्र, हा माझा आप्त, ही माझी स्त्री, ही माझी सपत्ति इत्यादि विकल्प कसे, केव्हा व का होतील ८ आरभी दृश्य उत्पन्न झालेले नाही, ते उत्पन्न न होताच व्यर्थ भासत आहे, असे ध्यास समजले आहे त्याला इष्ट वस्तूविषयी इच्छा व अनिष्टाविषयी द्वेप कसा वाटणार ? असे जर आहे, तर लीलेने ज्येष्ठशम्यांच्या अगावरून हात का फिरविला म्हणून विचारशील तर सागतो-तिने जो त्यास हस्त- म्पर्श केला तो पुत्रप्रेमामुळे नव्हे. तर त्या ज्येष्टशांच्या भावी कल्याणा- करिता उन्मुग्व झालेले त्याचे पूर्व पुण्य व फलादात्या ईश्वराचे ज्ञान यानी युक्त अमलेल्या सर्वावार चितिशक्तीचेच ते विवर्तरूप फल होय. साराश वस्तुत. आकाशाहूनही अति सूक्ष्म व अनि शुद्ध असलेला हा बोध पूर्वी जसे चितन करितो तसाच तो तात्काळ होतो. राधवा, सर्वत्र तोच पदार्थ- समूहरूप होत असतो व स्वप्नामध्ये भासणाऱ्या नगरात या सिद्धाताचा उत्तम अनुभव येतो २६. सर्ग-२७ विस्मित झालेली लीला पुनरपि पतीच्या दर्शनाकरिता उत्सुक झाली, ज्ञप्तीने तिला बोध केला, तेव्हा मागच्या अनेक जन्माचे स्मरण होऊन तिने त्याचे वर्णन केले, असे येथे सागितले आहे.