पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ बृहद्योगवासिष्ठसार. आमच्या आईबापाकरिता या लोकच्या प्रत्येक वस्तूस दुःख झालेले असून त्यान्या गमनाने देवलोकी मात्र मोठा उत्सव होत आहे. कारण तेथे गायन, नृत्य, वादन इत्यादि सर्व मोठ्या प्रमाणावर चालले आहे. यास्तव, अहो देवीनो, आमचा शोक नष्ट होईल, असा काही उपाय करा मोठ्या शक्तींचे दर्शन कधीही निष्फळ होत नसते, ज्येष्ठशाचे हे भाषण ऐकून लीलेस फार दया आली व तिने मोठ्या प्रेमाने त्याच्या शरीरावरून हात फिरविला. त्या बरोबर त्याचे दुःख, दुर्भाग्य व सकट नाहीसे झाले त्याच्या प्रमाणेच त्या गिरिग्रामातील इतर सर्व जनही दुःखादिरहित व देवाप्रमाणे तृप्त झाले. श्रीराम-महाराज, पण त्या लीलेने झणजेच त्या ज्येष्ठशाच्या आईने त्याला पूर्वरूपाने दर्शन का दिले नाहीं । ज्ञानाभ्यासाच्या योगाने सत्यसकल्प झालेल्या तिला तसे कारता येणे अशक्य नव्हते. श्रीवसिष्ठ-होय. तिला तसे करिता आले असते. पण प्रपच मिथ्या कसा ह्याचा निर्णय करण्याकरिता ती तेथे आलेली होती. पुत्रस्नेहामळे तिचे तेथे आगमन झालेले नव्हते. हा पुत्रादि प्रपच मिथ्या आहे, असा निश्चय झाल्यावर, हा आपला पुत्र आहे, असे वाटून त्याच्याविषयी प्रेम असणेही शक्य नव्हते. तत्त्वज्ञानाच्या योगाने मूलाज्ञानाचा बाध झाल्यावर वर्तमान शरीराहून निराळे भौतिक शरीर घ्यावे लागत नाही, असा नियम आहे. ह्मणून तिने पूर्व शरीर घेतले नाही. जो कोणी अज्ञानाच्या योगाने मिथ्या पृथ्व्यादि सघातास सत्य समजतो त्याचे अद्वितीय व शुद्ध चैतन्याकाश पिडरूपतेस धारण करिते. पण जो तत्त्वज्ञ असतो त्याचे चिदाकाश देहरूप होत नाही. बालकास अधारात असलेला पुरुषच वेताळ आहे, असा भ्रम होतो. हे स्वप्न आहे, असे समजताच स्वप्नातील सर्व पदार्थ जसे असत्य ठरतात त्याप्रमाणे तत्त्वज्ञान झाले असता पूर्वी जाग्रतीत सत्य वाटणारे पदार्थही असत्य आहेत, असा निश्चय होतो. ज्याचे मस्तक फिरले आहे अशा मूर्खाम पृथ्वीही आकाशासारखी भासते. फार काय, पण शहाण्याना सुद्धा भीतीवर दरवाज्याचे चित्र काढून त्यात उघड्या दरवाजाची छाया चागल्या रीतीने दाखविलेली असल्यास द्वाराचा भ्रम होऊन ते त्यात शिरू लागतात. स्फटिकाच्या भिंतीकडे पाहून तर आम्ही सुद्धा पुष्कळ वेळां फसलेले आहो. स्वप्नात, जे नगर असतें तें