पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २६. २११ परदुःखनिवारण करणे हेच प्रायः सज्जनांचे स्वकर्म अथवा बीद असतें. त्यावर त्या देवी मोठ्या आदराने झणाल्पा-तुमच्या दुःखाचे कारण काय भाहे? तुझी सर्व अशी दुःस्वी का? ते ऐकून ज्ये- टशर्मादिकानी आपल्या दुःखाचे कारण, असें सागितलें.-- जननी, काय सांगावे ? या गृहांत एक ब्राह्मणाचे प्रेमळ दापत्य होते. ते सर्व अतिर्थीचं आतिथ्य करणारे, कुलाची वृद्धि करणारे व द्विजमर्या- देचे आधारभूत, असे होते. पण पुत्र, पशु, बांधव इत्यादि सर्वांचा त्याग करून ती दोघेही आमची आईबा स्वर्गास गेली. त्याच्या वाचन आमास हे त्रिभुवन शून्य वाटत आहे. (प्रत्येक प्राणी आपल्या चित्ताप्रमाणे जगास पहातो. आनदी सर्व जग आनदपूर्ण आहे, असे पहातो, दुःखी सर्व जगास दुःखी समजतो; व लोभ्यास सर्व प्राणी लोभी दिसतात; या न्यायाने आता ज्येष्ठशर्मा वर्णन करीत आहे. ) अहो, हे पक्षी या घरावर बसतात व त्यांस आमच्या पित्याची आठवण झाली की, ते आपली शरीरे आकाशात फेकून देतात आणि पंखांच्या योगाने आपल्या चित्ताची तळमळ व्यक्त करून मधुर स्वराने त्यांच्या करिता रडतात. हा पर्वत त्याच्या करिता रडू लागला झणजे त्याच्या गुहारूपी मुखातून गुरगुर असा मोठा ध्वनि निघू लागतो. केव्हा केव्हां त्याच्या नेत्रातून निघालेले अश्रु-प्रवाह नदीरूपाने त्याच्या अंगावरून खळखळ वाहू लागतात. त्याच्या आपत्तीमुळे दिशा धूसुर झाल्या आहेत. हा सर्व ग्राम आक्रोश करून मस्तक ताडणादिकाच्या योगाने शरीरास लिन्न भिन्न करून घेत आहे व त्यातील सर्व लोक उपवासाने व्याकुळ होऊन मरणोन्मुख दिसत आहेत. प्रात काली येथील वृक्षही अश्रु ढाळित असतात व त्याचा टप-टप असा बनि कोणालाही सहज ऐकू येतो. रात्रिसमयी लोकाची रहदारी कमी झाली की, रध्याही (राजमार्गही ) एकाद्या आनंद- रहित व शून्यचित्त विधवेप्रमाणे होऊन जाते. या उपवनातील बेलीही कोकिळ, भ्रमर इत्यादिकाच्या द्वारा आक्रोश करितात व आपल्या पल्लव- रूपी हस्तानी स्वशरीरास ताडण करितात. आमच्या मातापितरांच्या मरणाने दुःखी झालेले हे जलप्रवाहही आपल्या शरीरास शतधा छिन्न भिल करण्याकरिता पर्वताच्या कड्यावरून खाली घालवून घेत आहेत. नद्या समुद्रात जीव देण्याकरिता मोठ्या वेगाने निघाल्या आहेत. साराश