पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० बृहद्योगवासिष्ठसार. होते. ग्रीष्म ऋतूतील उष्णतेने वाळून गेलेल्या उपवनाप्रमाणे; वीज पटल्यामुळे जळलेल्या वृक्षाप्रमाणे वायूने उडविलेल्या मेघाप्रमाणे, दवाच्या योगाने म्लान झालेल्या कमलाप्रमाणे किवा तेल-वात सपलेल्या दीपाप्रमाणे ते गृह दर्दर्श ( ज्याच्याकडे पाहवत नाही असें ) झाले होते. गृह- स्वामीच्या वियोगामुळे मेल्यासारखेच झालेले ते गृह पाहूम लीलेच्या चित्तात दयेचा प्रादुर्भाव झाला. प्रत्यक्ष दर्शन देऊन आपण या दीन व दुःखी प्राण्यावर अनुग्रह करावा; असे तिच्या मनात आले. शुद्ध ज्ञानाचा थोडासा अभ्यास केल्याकारणाने व ज्ञप्तिदेवीच्या कृपेमुळे ती देवाप्रमाणे सत्यसकल्प व सत्यकाम झाली होती, झणजे तिचा प्रत्येक सकल्प व इच्छा सफल होत असे. पापी प्राण्याचे सकल्प व इच्छा केवल सफल होत नाहीत, इतकेच नव्हे; तर त्याच्या उलट फल मिळत असते. असो, सत्यसकल्प लीलेने मला व या माझ्या प्रिय देवीला हे माझे बाधव सामान्य स्त्रीस्वरूपाने पाहोत, असे मनात आणताच त्या गृहातील सर्व लोक त्यास लक्ष्मी व गौरीप्रमाणे पाहू लागले. त्यांच्या तेजाने त्या मृततुल्य गृहास शाभा आली. त्यानी आपल्या गळ्यात पायापर्यत लोबणाऱ्या नानाप्रका- रच्या ताज्या फुलाच्या माळा घातल्या आहेत, असे तेथील लोकास दिसले. त्यामुळे सर्व उपवनास सुवासित करून सोडणाऱ्या या दोघी वसतलक्ष्मीच तर नसतील, अशी त्यास शका आली. सर्व औषधिवने व ग्राम यास रसायनाच्या योगाने भरून सोडणाऱ्या व सर्वास आह्लाद देणाऱ्या या दोन चद्रकलाच असाव्यात, असा कित्येकानी तर्क केला. त्याचे केस काळे- भोर व लाब होते, नेत्र हरिणींच्या नेत्राप्रमाणे गरगरीत व पाणीदार होते; त्याची अगकाति सुवर्णरसाप्रमाणे होती. त्या लावण्याच्या जणु काय खाणीच होत्या. त्याचे तळहात रक्तकमलाप्रमाणे लाल होते. तळपाय कोमल पल्लवाप्रमाणे होते व त्याच्या प्रेमपूर्ण दृष्टीनेच तेथील लोक अमृत, वृष्टीप्रमाणे तृप्त होत होते. असो; अशा प्रकारच्या त्या दिव्य स्त्रियास पाहताच, दुःखाने व्याकुळ झालेला त्या ब्राह्मणाचा ज्येष्ठशानामक पुत्र गहातील सर्व लोकासह उठून उभा राहिला व " तुझा वनदेवतांस नम- स्कार असो, " असे अणून त्याने त्याच्यावर पुष्पें उधळली व त्याच्या चरणावर पुष्पाजलि वाहिली. नतर ज्येष्ठशर्मादि ते सर्व सणाले-अहो वनदेवींनों, आमच्या दुःखनाशार्थ भालेल्या तुमचा जय-जयकार असो,