पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २६. २०९ रखी भयकर राक्षसी कामे करीत आहेत; कोणी भोजन करीत आहे; कोणी ते मिळविण्याच्या उद्योगात आहे; कोणी मोठ्या प्रयत्नाने भक्ष्य मिळवून त्याचा उपभोग घेणार, इतक्यात दुसरा कोणी बलाढ्य त्याच्या तोडातून ते हिसकून घेत आहे व त्यामुळे तो निर्बल प्राणी आक्रोश करीत आहे; कोठे मोठमोठी अरण्ये आहेत व त्यातील प्राणी आपापल्या स्वभावानुरूप चेष्टा करीत आहेत, कोठे खरी व कोठे मृगजळाची मोठमोठी सरोवरे आहेत; कोठे दिवस आहे; कोठे रात्र आहे, कोटे चराचा प्रकाश भुवनास प्रकाशित करीत आहे; कोठे अधकाराने न्यास आपल्या पोटात साठविले आहे; कोठे सायकाळ होत असून न्यावेळची शोभा नेत्रास आनद देत आहे, तर कोठे प्रात:- काल होत आहे, कोठे मोठमोठी नगरे आहेत, कोठे लहान ग्राम आहेत, कोठे पर्वताच्या रागा लागलेल्या असून त्यातून अनेक नद्या वहात जाऊन समुद्रास मिळत आहेत आणि कोठे शात व गभीर देखावा दिसत असून क्वचित् अगदी त्याच्या उलट प्रकार अनुभवास येत आहे. साराश, येणेप्रमाणे समुद्र, पर्वत, अरण्ये, लोकपाल, आपापल्या अविद्या- काम-कमांप्रमाणे सुख-दु खादि फलभोग घेणारे नानाप्रकारचे असख्य स्थावर, जगम, स्थलचर व जलचर जीव यानी व्याप्त असलेले ते भूतल पाहून मला लागलीच त्या भूलोकी असलेल्या आपल्या मदिराधारास ह्मणजे गिरिग्रामास पाहती झाली २५. सर्ग २६-लीलेने आपल्या गृहात आपल्या लोकास पाहिले; त्याचा विलाप - ऐकिला व त्याच्यावर अनुग्रह केला, असे आता वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामा, त्या दोघी मुदर स्त्रिया पद्मराज्याच्या आधारभूत ब्रह्माडमडलातून निघून वर वर्णन केल्याप्रमाणे दुसऱ्या ब्रह्माडमडलास येऊन पोचल्या. त्यातच त्या वसिष्ठ ब्राह्मणाचे स्थान होते. नतर त्या दोघी सिद्ध स्त्रियास त्याचे इष्ट गृह दिसले. तेथील कोणाही प्राण्याच्या दृष्टी न पडता त्यानी त्या ब्राह्मणास्पदाचे निरीक्षण चालविले. त्यातील सर्व दासी चितातुर होत्या. स्त्रियाची मुखें अश्रूनी भिजून गेली होती. या सर्वाची वदने निस्तेज दिसत होती. स्त्रियांच्या मुखचद्रावर हळद, कुकू, काजळ, इत्यादिकातील एकही शुभ लक्षण नव्हते. ते अगस्त्यमुनीने पिऊन टाकिलेल्या समुद्राप्रमाणे व उत्सवशून्य नगराप्रमाणे शून्य दिसत १४