पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० बृहद्योगवासिष्ठसार. कंटक होते. असो, अशा त्या कमलाची जंबुद्वीपसंज्ञक विस्तृत कर्णिका होती. नद्या हीच तिची मुख्य केसरे असून नगरें व ग्राम ही गौण केंसरे होती. सात कुलपर्वत हीच तिची सुंदर बीजे असून त्याच्या मध्य- भागी असलेल्या उच महामेरुनामक बीजाने तर तिचे अतरिक्ष व्यापून टाकिले होते. अनेक सरोवरें हेच त्याच्या वरील दवाचे बिदु होते. वन व इतर स्थल यांतील धूळ हाच त्या कमलाचा पराग होय. या कर्णिकेच्या चारी बाजूस ठिकठिकाणी मडलें करून त्यात रहाणारे लोक हेच त्या- वरील किडे होते. शेकडो योजने लाब असलेल्या व प्रति चंद्रोदयास ग्राद्धिंगत होणाऱ्या चारी दिशेतील अष्टदिक्पालासह चार समद्ररूपी मोठ्या भ्रमरानी ते व्याप्त असून नऊ भावानी त्याचे नऊ विभाग करून ते वाटन घेतले होते. ते अनेक योजने विस्तीर्ण असून धुळीने भरलेले होतें. साराश येणेप्रमाणे ते भूमडल अनेक देश, अनेक लोक, अनेक म्थावर पदार्थ व अनेक चमत्कारिक देखावे यानी भरून गेलें होतें. ते क्षीरसागराने चोहो बाजूनी परिवष्टित असून त्याचे प्रमाण जबूद्वीपाच्या दुप्पट होते. त्याच्या पलीकडे ( सभोवार ) ककणाकृति शा- काख्य द्वीप होते. त्यास नूतन, मधुर व शीत क्षीरसागराने व्यापिलें होतें. त्याच्या पलीकडे कुशद्वीप असून त्यासही पूर्व समुद्रा- प्रमाणेच ककणाकृति दधिसमुद्राने वेष्टिले होते. त्याच्या पलीकडे नौचद्वीप असून ते घृतसागराने परिवष्टित होते. त्याच्या पुढे शाल्मली दीप असन ते पापपूर्ण व मरासागराने वेष्टित होते. त्याच्या पलीकडे गोमेदद्वीप असून ते इक्षु-इम सागराने परिवोष्टत होते व शेवटी मधुर जलाच्या सागराने परिवेष्टीत असलेले पुष्करद्वीप होते. त्याच्यापुढे भयकर पातालादि लोक लागतात. सर्वाच्या मध्यभागी असणान्या जबुद्वीपामध्ये चाललेले अनेक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडले. त्यात कोठे काजळासारिखे काळे कुट्ट मेघ दिसत असून त्यातूनच क्षणप्रभा (वीज) चमकत आहे, कोठे उष्णता मी ह्मणत आहे व त्यामुळे नदी, नाले इत्यादिकातील जल सकून गेले आहे; कोठे असह्य वर्षाव होत असून नद्या भरून वहात आहेत; कोणी हसत आहेत, कोणी रडत आहेत; कोणी उदासीन होऊन शांतमनाने परमेश्वराचे ध्यान करीत आहेत; कोणी विक्षिप्त मनाने प्रवृत्तींत गुंग झाले आहेत; कोणी कलह करीत आहेत तर कोणी प्रत्यक्ष हिंसेसा