पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २५. २०७ अमृतपूर्ण चद्ररूपी सरोवर होते व कोठे देवाच्या शक्तीने घनीभूत झालेले जलमय सरोवर होते. ते आकाश कचित् उदय पावणान्या चद्राने युक्त, होते, कोठे सूर्योदयमय होते; कोठे तर त्यात रात्र पसरली होती. कोटे ते सायकालीन सूर्य किरणाच्या योगाने कपिलवर्ण दिसत होते, क्वचित् धुक्याच्या योगाने धूसुर झाले होते व क्वचित् ते बर्फाच्छादित मेघयुक्त होते. त्यात क्वचित् स्थलाप्रमाणेच लोकपाल विश्राति घेत होते. कोटें कोठे देव-दानवादि प्राणी खालींवर जाण्या-येण्यात व्यग्र होते. साराश येणेप्रमाणे ते आकाश अनेक प्राणी, अनेक क्रिया, अनेक पदार्थ, अनेक देखावे, असख्य चमत्कार व अवर्णनीय शोभा यानी भरलेले होते. उंबराच्या फळातील किड्याप्रमाणे ज्यातील प्राण्याचा सर्व व्यवहार चालला आहे अशा त्या चमत्कारिक आकाशास पाहून व त्यातील भवास तुन्छ लेखून त्या दोघीजणी पुनरपि भूलोकी जाण्यास तयार झाल्या २४. सर्ग २५ ---सप्त सागर, द्वीपे, आणि ब्रह्माडावरणे यानी युक्त असलेले एक व भुवन त्यानी पाहिले, असे येथे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ--राघवा, ज्ञप्तिदवांच्या मनात लीलेला जे भुवन दाखवा- वयाचे होते त्या अपूर्व भुवनास ( अर्थात् त्या इष्ट गिरिग्रामास) त्या दोघीजणी येऊन पोचल्या व आकाशातून खाली उतरून त्यानी ते भूतल पाहिले. (ते ब्रह्माड-पुरुषाचे हृदयकमल होते, असे आता वर्णन करितात.) ते भूतल झणजे ब्रह्माड-पुरुषाचे हृदयकमलच होते. अष्ट दिशा ह्याच त्याच्या आठ मोठ्या पाकळ्या होत्या. पर्वत हीच त्याची केसरे असून स्वमुत्रासाने ते भरलेले होते. नद्या हीच त्याची उपकेमरे असून हिमकण हेच त्यातील मकरद-बिंदु होते. भाग्यवस्तूतील गुण हेच त्याच्या देठा- तील ततु होत. ज्यातून पाण्याचे पूर वहात आहेत अशी पातालादि अवोभुवने हीच ज्याच्या नालातील छिद्र आहेत, असे ते कमल मूर्याच्या प्रकाशाने शोभायमान होत होते. ते मधुरादि अनेक रगानी भरलेले होते. त्याच्यावरून हस (सूर्य) भ्रमण करीत असे. रात्री त्याचा सकोच होत असे. पाताटरूपी पका( चिखला)मध्ये निमग्न होऊन राहिलेला सर्प- राज हेच त्याचे मणाल (बिस ) होते. जलापासून उत्पत्ति झालेली असल्यामुळे त्याचे आस्पद असा जो महासागर त्याच्या कपामुळे त्याचीही दिशारूपी दले कपायमान होत असत. दैत्य व दानव हेच त्यातील