पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २४. २०५ मेघ याच्या प्रचारामुळे ज्योतिश्चक्र फिरत होते. कोठे कोठे सूर्याच्या अगदी जवळ असलेल्या सामान्य योग्यास सूर्यकिरणाच्या योगाने संताप झाल्यामुळे ते तें स्थान सोडीत होते. त्या आकाशात अल्पस्वल्प विमानास सूर्य जाळीत आहे व त्याच्या घोड्याच्या तोंडातून निघणाऱ्या वाऱ्याच्या योगाने ती उडत आहेत, असे त्या दोघीजणींस आढळले. (म्हणजे सामा- न्य पुण्यसंचयामुळे प्राप्त झालेल्या विमानादि वस्तूची तेथे फारशी दाद लागत नसे व त्याचा इतर बलाढ्य शक्तींच्या योगानें नाश होई.) इद्रादि लोकपाल व अप्सरासमूह याच्या हातापायाच्या हालचालीमळे ते चंचल असल्यासारिखा भास होत असे. देवींच्या अतःपरांत जाळलेल्या धूपाच्या योगाने देवलोकचा ऊर्ध्वभाग मेघाच्छादित अतरि- क्षाप्रमाणे दिसत होता. इद्र, चद्र, इत्यादि देवाच्या लोकात ( ह्मणजे त्याच्या त्याच्या स्वगीत) बोलाविल्यामुळे मोठ्या गडबडीने जाणाऱ्या अप्स- राच्या शरीरावरील भूषणे गळून त्या आकाशात कोठल्या कोठे जात होती. पण इद्रादिकाचे पाचरण येताच आपल्या प्रिय अप्सराही आपणास सोडून तिकडे गडबडीने जात आहेत, असे पाहून इद्रादिकाप्रमाणे पूर्ण ऐश्वर्याने युक्त नसलेले स्वर्गवासी सिद्ध क्रोध व असूया यानी यक्त होत व त्यामुळे त्याचे असलेले तेजही नष्ट होई. पुढे तेजो- नाशामुळे ते सिद्धही आकाशाप्रमाणेच कृष्णवर्ण झाले आहेत, असे त्याच्या अनुभवास आले. ( तेजोनाशक तमोगुणाच्या प्राबल्याप्रमाणे तें आकाश अधकारमय होते, असा याचा शब्दशः भावार्थ आहे. ) बलान्य सिद्धाच्या समूहाच्या जाण्यायेण्याने छिन्न भिन्न झालेल्या व त्यामुळे भीतीने जवळच असलेल्या हिमालयादिकाच्या शिखराचा आश्रय करणाऱ्या मेघाच्या योगाने त्या आकाशातील पर्वत वस्त्रयुक्त असल्यासारिखे दिसत होते. कावळे, घुबडे, गिधाडे, भास इत्यादि पक्षी त्यातून सैरावरा उडत होते. तरगाच्या योगानें समुद्र जसा नाच करीत असल्यासारिखा भास होतो त्याचप्रमाणे नाचणाऱ्या डाकिणींच्या योगाने ते आकाशही नाच करीत आहे, असे त्यास वाटले. ज्याची तोडे कुत्री, कावळे, उट, गर्दभ इत्यादिकाच्या तोडासारिखी आहेत अशा योगिनी अणिमादि अष्टसि- द्वींनी सपन्न होत्या. त्यामुळे त्यास पाहिजे ती वस्तु बसल्या ठिकाणींच मिळत असे. तरी सुद्धा त्या उगीच दूर जाऊन परत येत होत्या व अशा