पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ बृहद्योगवासिष्ठसार. धारागृहेच आहेत, अशा समजुतीने त्या भ्रमण करू लागल्या. त्यावेळी त्यांच्या मस्तकावरील मेघमंडल, हा धारागृहाचा मडपच आहे, असा त्यास भास होणे अगदी साहजिक होते. असो, याप्रमाणे त्या विश्राति घेत घेत आपल्या शक्तीप्रमाणे जात असताना, एका शून्य प्रदेशी, भुवने व त्यांतील जन यास उत्पन्न करण्याचे काम जेथे चालले होते, असे एक आकाश त्यास दिसले. एकट्या ज्ञप्तीने हे आकाश पूर्वी पाहिले होते. पण त्या दोघींनी मिळून ते आताच पाहिले. अर्थात् त्याना ते अपूर्व आकाश दिसले. अनेक सकटानी युक्त असलेल्या गर्भाशयादि असख्य छिद्रानी तें भरलेले होते अर्थात् तें आकाश (मर्व प्राण्याच्या ससारदु खाचे आश्रयस्थान) या जगासारख्या अनत कोटी जगानीही भरणार नाही, इतके मोठे होते. एकावर एक व उच उच अशा अनेक व पृथक् पृथक् भूतलरूपी विचित्र अलकाराकार विमानानी ते युक्त होते चोहोकडून अतरिक्षास भरून सोडणाऱ्या मेरु इत्यादि पर्वताच्या पद्मराग–मणिमय तटाच्या प्रकाशामुळे त्याचे उदर कल्पातीच्या ज्वालेसारिखे दिसत होते. त्याच पर्वताच्या मुक्तामय ( मोत्याच्या ) शिखराच्या प्रभेमुळे ते हिमालयाच्या सपाट भूमी- प्रमाणे दिसत होते सुवर्ण पर्वताच्या कातीमुळे ते सुवर्ण स्थलाप्रमाणे चमकत होते. त्याच पर्वतान्या हिरव्या रंगाच्या मरकत मण्याच्या प्रका- शाने ते आकाश दूर्वानी युक्त असलेल्या भूमीप्रमाणे हिरवे झाले होते. कोठे कोठे तर पहाणाऱ्याच्या नेत्रापुढील रूपाचा क्षय करण्यास सवक- लेल्या अधकाराच्या योगाने ते काळे दिसत होते. क्वचित् स्थळी पारिजात कल्पलतेच्या वनावर चचल विमानाचे स्थान असल्यामुळे जवळून पहा- णारास मजरीच्या आकाराचा देखावा दिसे व दुरून पहाणारास ते वैडूर्य- मणिमय भूतल आहे, असा भास होई. त्या आकाशात मनोवेगाने जाणाऱ्या महासिद्धानी वायूच्या गतीस तुच्छ करून सोडिले होते. विमानातील देव- स्त्रियाच्या गानवाद्यादिकामुळे ते घुमघुमत होते. त्रैलाक्यातील श्रेष्ठ भूताच्या अनेक समूहाचा त्यात एकसारिखा सचार चालला होता. त्यामुळे त्यात एकच गर्दी उडाली होती. पण त्यातील देव राक्षसास दिसत नव्हते व राक्षस देवास दिसत नव्हते. आवह, प्रवह इत्यादि वातभेद (भिन्न भिन्न वायु) विमानाच्या समूहास वाहून नेत होते. वेगाने चालणाऱ्या विमा- नाचा ध्वनि मेघध्वींस अगदी तुच्छ करून सोडीत होता. प्रह, नक्षत्रे