पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २४. २०३ ल्पांच्या जाग्रत् झालेल्या संस्काराच्या द्वारा त्याची तशी कल्पना झाली. अर्थात् त्या टीचभर प्रदेशातच त्याना ते सर्व दिसले. असो, त्या दोषी चिदाकाशरूपी झाल्या. त्यांची शरीरें आकाशांत फिरू लागली. त्या सुदर स्त्रियास पुढे फार मोठे आकाश दिसले. कारण विषयानुरूप व्यवहार करविणे हा विषयज्ञानाचा स्वभावच आहे. आपण आता कोटि योजनें दूर उडून जाऊ या, असा चित्प्रधान-मानस-सकल्पवृत्तीने त्यानी बेत केला व त्याप्रमाणे वस्तुत त्या आपल्या अतःपुरातच असताना पूर्व सकल्पाप्र- माणे त्या विस्तृत आकाशात चिदाकाश शरीराने गेल्या व तेथे एकमेकीस पहाताच त्या पूर्वीप्रमाणे मैत्रिणी झाल्या. ( अर्थात् या पूर्वीचे त्याचे सर्व ज्ञान व सकल्प स्वतत्रपणे होत होते. पण ते एकसारखेच होत असल्या- मुळे दोघीचा एकदम निर्देश केला आहे. वस्तुत• आकाशात दृर उडून गेल्यावर त्याची गाठ पडली) २३ सर्ग २४-अनत विश्वाचे वैचित्र्य ज्याच्यामध्ये साठविले आहे, अशा आकाशाचें ___ व त्यातील त्या दोघांच्या मार्गाचे या सर्गात वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ-एकमेकीचा हात धरून त्या दोघीजणी आणखी वर गेल्या व त्यानी चागले निरीक्षण केले. तेव्हा ज्याचा अतर्भाग अतिशय निर्मल आहे असे, गभीर, एका सागरासारिखे अतिशय वाढलेले, जणु काय कोमल, मद वायूच्या स्पर्शाने सुख देणारे, शून्यतारूपीजलात निमजन केल्यामुळे ( बुडी मारिल्याकारणाने ) अतिशय आह्लाद देणारे, सज्ज- नाच्या चित्ताहूनही शुद्ध व प्रसन्न आणि स्वत भव्य आकाश त्याना दिसले. चारी दिशातील मेरु-मदारादि पर्वताच्या शिखरावर असलेल्या निर्मल मेघाच्या उदरातील (ह्मणजे मध्यभागी असलेल्या ) गच्चीवर त्या दोघीनी जरा विश्राति घेतली. गधर्व व सिद्ध याच्या गळ्यातील मदारादि पुष्पमाळाच्या सुवासाने मनोहर आणि जवळच्या चद्रमडालातून निघा- ल्यामुळे अति शीतल व मद वायूमध्ये त्या रममाण झाल्या. एकाद्या कमलयुक्त सरोवरात जसे स्नान करावे त्याप्रमाणे वीजेने युक्त असलेल्या व जलाने भरलेल्या मेघामध्ये त्यानी स्नान केले. अनेक भूतलावरील हिमालय, विध्यादि इत्यादि पर्वत हेच ज्यातील कमलाच्ण काद्यापासून निघालेले अंकुर आहेत अशा दिशामध्ये त्या ययेन्छ फिरल्या. वायूच्या वेगामुळे गंगेच्या प्रवाहातून जे असख्य बिदु उडत होते त्यात, ही कारंजानी युक्त अशी