पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ठ-इतके सभाषण करून त्या दोघीजणी · समाधिस्थानी जाऊन बसल्या. त्यावेळी तेथील सर्व सेवकवर्ग स्वस्थ झोप घेत होता अत पुराचे सर्व दरवाजे घट्ट बद करून टाकले होते. त्या गृहात चोहो- कडे सुवास मुटला होता, शवाच्या अगावरील पुष्पे जशीच्या तशीच टव- टवीत होती व बाहेरील सेवकवर्ग नगररक्षणाच्या कामात दक्ष होता. अमो, लीला व देवी यानी शवाजवळच आसनावर बसल्यावर चित्ताचे ऐकाय करण्याकरिता आपले अग निश्चल केले व त्या चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन सहिल्या. त्यानी सर्व चिता सोडिल्या व इद्रियाचा निरोध केला. न्याबरोबर त्या अत्यत शात, शुद्ध व स्पदरहित झाल्या. त्यास निर्विकल्प- समाधीची प्राप्ति होताच बाह्य ज्ञान होईनासे झाले त्या देहादि अनात्मव- स्तूस विसरल्या. ऋतु बदलला असता वली पूर्व रसास सोडून नव्या रसाने जशा भरून जातात त्याप्रमाणे त्या पूर्व वासनाचा त्याग करून अगदी नव्या व शुद्ध झाल्या मी व हे जग, याचा असभव आहे, असे त्यास स्वानुभवाने समजताच त्याच्या मागचे दृश्य-पिशाच सुटले. निष्पाप रामा, आमा अनुभवज्ञानाने युक्त असलेल्या पुरुपाना जमे दृश्य मृगजलासारिखे दिसते तसे ते त्या समावीत असलेल्या स्त्रियाना सशाच्या शिगाप्रमाणे असत् दिसले. (अर्थात् आह्मी दृश्याम पहात असूनही ते त्रिकाली असत् आहे, असें जाग्रतीतही विवेकाने जाणतो. पण त्याना समाधीत गल्यावर मात्र ते असत् आहे, ते मुळीच नाही, असा अनुभव आला, असा याचा भाव ) कारण उत्पत्तीपूर्वी व नाशानतर जे नसते ते वर्त- मानसमयीही नसते. यास्तव ते भासले तरी व न भासले तरी असत्च होय असो, त्यानतर त्या दोघीही सूर्य, चद्र इत्यादि सर्व साकार वस्तु व प्रथ्वी, जल, तेज आणि वायु याचा नाश झाल्यावर राहणाऱ्या एका शुद्ध आकाशाप्रमाणे अगदी शात व शुद्ध झाल्या. पण पुढील आकाशात जाताना देवीचा केवल ज्ञानदेह होता व लीलेचा तिच्या ध्यान-ज्ञानानुरूप अज्ञा- नमिश्रित ज्ञानदेह होता. ह्मणजे त्याच्या ज्ञानाप्रमाणे त्याच्या शरीरात न्यूना- धिक ज्ञान-सामध्ये होते. पण त्या दूर आकाशात गेल्या अशी जी त्याची कल्पना झाली आहे ती खरोखरीच त्या, त्या देहातून निघून, कोठे दूर गेल्या होत्या, ह्मणून नव्हे, तर त्या शरीरातील हृदयापासून कठापयत टीच भर प्रदेशात जो नाडीमार्ग आहे त्यात आरूढ होऊन पूर्व सक-