पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २३. २०१ स्त्री, पुत्र, धन, गृह, इत्यादिकांचा ) त्याग करणे, या सौंदर्याने व वैराग्य- रसाने युक्त असणाऱ्या ज्याची मति आनंदाचा अनुभव घेत असते ते उत्कृष्ट अभ्यासी होत. (श्रवण, मनन इत्यादिकात तत्पर होणे हेही तत्त्वाभ्यासाचे लक्षण आहे, असें आता देवी सागते-) ज्ञाता व ज्ञेय याचा अत्यत अभाव व्हावा ह्मणून युक्ति व शास्त्र याच्या योगाने जे प्रयत्न करितात तेही ब्रह्माभ्यासीच होत. (येथे युक्ति या शब्दाने केवळ प्रमा- णाच्या व प्रमेयाच्या तत्त्वनिश्चयास अनुकूल असलेली युक्ति घ्यावी व शास्त्र या शब्दाने केवळ अध्यात्मशास्त्र ध्यावे.) हे दृश्य त्रिकालीही सत्य नाही, तर ते सदा ह्मणजे वर्तमान कालीही मिथ्या ( बाधित होणारे ) आहे, असे वारवार चितन करणे हाही ब्रह्माभ्यास आहे. हे दृश्य सत्य असणे संभवत नाही, असा बोध झाल्यामुळे राग-द्वेषादि दोष क्षीण होतात व मननाच्या योगाने विद्यावासना दृढ होते. नंतर त्यामुळे उत्पन्न होणारी जी आत्मप्रीति तोच ब्रह्माभ्यास आहे. दृश्य मिथ्या आहे, ही भावना दृढ झाल्यामुळे जो रागादिकाचा क्षय होतो तोच ज्ञानाच्या उपयोगी असतो. पण केवळ बलात्काराने राग-द्वेषाचा निरोध करणे याला तप ह्मणतात. तो निरोध ज्ञानाच्या मुळीच उपयोगी नसून दुःख मात्र देतो. कारण अत्यसाक्षात्कार- रूप ज्ञान व ज्ञेय ब्रह्म यासच दृश्यासभव-बोध ह्मणतात. (कारण तशा बोधाच्या योगाने दृश्याचा असभव आहे, असें निश्चित होते.) त्याच्या अभ्यासाने निर्वाण प्राप्ति होते. यास्तव अभ्यास मोठे फल देणारा आहे. असो, याप्रमाणे चित्तात विवेक सतत जाग्रत् ठेविल्याने अविद्या आपल्या मोहसज्ञक कार्यासह निवृत्त होते. वाल्मिकि राजा, मनिवसिष्ट रामचद्रास असे सागत आहेत तों भगवान् दिनकर अस्ताचलाच्या शिखरावर गेला व ते पहाताच सर्व सभा- सद सायंकालीन नित्य कर्मानुष्ठानाकरिता आपापल्या स्थानी गेले. दुसऱ्या दिवशी प्रातःकालच्या सर्व अवश्य क्रिया सपवून त्या गुरु-शिष्यांचा रमणीय सवाद ऐकण्याकरिता ते मोठ्या उत्कठेने राजसभेत आले २२. येथे चवथा दिवस सपला. सर्ग २३-लीलेने गिरिग्राम पाहण्याच्या इच्छेने, योगाच्या योगानें, स्थूल शरीराचा त्याग केला व नंतर त्या दोघीजणी त्या विस्तृत मंडपाकाशात गेल्या, असे वर्णन या सर्गात केले आहे.