पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० बृहद्योगवासिष्ठसार. कल्पिलेल्या देहाच्या आरंभास उपयोगी असलेल्या भूतमात्रांनी परिवेष्टित होत्साता परलोकी जातो. पण त्या मात्राचा त्यास अनुभव येत नाही. त्यामुळे त्याची ती आतिवाहिकता त्याच्या दृष्टीने असून नसून सारखीच त्याचा अज्ञानाने कल्पिलेला भूतमात्राश ( स्थूल अज्ञानदेह ) मरून पडतो, असें जवळच्या लोकांस दिसते वस्तुतः पाहिल्यास हा देह मरत नाहीं व जीवतही कधी नसतो. मरण व जीवन ह्या स्वप्नाप्रमाणे भ्राति होत. यास्तव तू ह्मणतेस तशी शका घेण्याचे काही कारण नाही. सकल्पाने बनविलेल्या पुरुषाचे मरण व जीवन जसे असत्य तसेच त्या शरीराचे मरण-जीवन असत्य भासते, असे तू समज. लीला-देवि, तू मला जे हे निर्मल ज्ञान सागितलेस ते ऐकून माझ्या चित्तास मोठी शाति प्राप्त झाली आहे. दृश्य खरे आहे अशी जी माझी इतके दिवस समजूत होती ती शिथिल झाली. आता माझ्यावर उपकार करून तत्त्वाचा अभ्यास ह्मणजे काय ? तो कसा करावा ? त्याची पुष्टि कशी होईल व तो पुष्ट झणजे दृढ झाल्याने कोणता लाभ होईल, ते मला साग. श्रीदेवी-लीले, अभ्यासावाचून काही सिद्ध होत नाही व अभ्या- साच्या योगाने सिद्ध होत नाही असेही काही नाही. आता अगोदर अभ्यासाचे स्वरूप तुला सागते. श्रवणाच्या व मननाच्या योगाने निश्चित झालेले तत्त्व आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावे ह्मणून त्याचेच सतत चितन करणे, दुसऱ्या ज्ञानी पुरुपाच्या अनुभवाशी आपला अनुभव जुळतो की नाही हे पहाण्याकरिता त्यास आपले तत्त्वज्ञान सागणे, न कळलेला ज्ञानाश कळावा ह्मणून बरोबरीच्या योग्यास आपला अनुभव सागून त्याचा ऐकणे व अशा रीतीने त्या एका तत्त्वामध्येच तल्लीन होऊन रहाणे यास अभ्यास ह्मणतात. यातील पहिल्या तीन उपायानी “ तत्त्वाचा असभव आहे " अशा स्वरूपाची जी असभावना ती निवृत्त होते व शेवटच्या उपायाने ह्मणजे तदेकपरायण झाल्याने मी देह आहे; कर्ता आहे; ब्राह्मण, मनुष्य, ज्ञानी, काळा, गोरा आहे-इत्यादि विपरीतभावना नष्ट होते. दृढ वैराग्य हेच त्याचे लक्षण आहे. यास्तव जे विरक्त महात्मे पुनर्जन्म घेण्याचा प्रसग न यावा ह्मणून मोठ्या प्रयत्नाने विषय- बासनाचा क्षय करितात ते या लोकी धन्य होत. सर्व परिग्रहाचा (ह्मणजे