पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २२. १९९ होय. (त्यानतर दृश्याचा भास होणार नाही, असा त्याचा भाव.) जेव्हा तुझा आतिवाहिक भाव अत्यत स्थिर होईल तेव्हा तुला सकल्पाने दूषित न झालेले (नित्य ) पवित्र लोक दिसतील. यास्तव, प्रिय लीले, वासना क्षीण होण्याकरिता प्रयत्न कर. त्या क्षीण झाल्या म्हणजे तू जीवन्मुक्त होशील. पण यावेळी तुझे चित्त-तो गिरिग्राम पहावा-या इच्छेने प्रतिबद्ध झाले आहे. त्यामुळे याक्षणी तुझ्या हातून वासना-क्षयाकरिता अभ्यासही होणार नाही व चागलासा आत्मबोवही होणार नाही. यास्तव तो बोधचद्र परिपूर्ण व शीतल होईतो तू या देहास येथेच ठेवून दुसरा लोक पहा. लीला--माझ्या या देहास आपल्या आतिवाहिक देहाशी मिळवून तू का नेत नाहीस 2 श्रीदेवी-अग खुळे, तसे जर करिता आले असते तर मी एवढा वेळ तुझी उपेक्षा का केली असती? पण मास-देह मास-देहाशीच मिळू शकतो. आई, आपल्या मास देहान्या कबरेवर आपल्या मलीन्या मास देहास उचलून घेते. व्यावहारिक कामव्ये चित्तदेहाशी त्याचा सबध होऊ शकत नाही. ज्ञानी व अज्ञानी या दोन्ही प्रकारच्या लोकाच्या अनुभवाने सिद्ध झालेली वस्तुस्थितिच मी तुला मागत आहे. हा वर किवा शाप नव्हे. लीला- लोकसिद्ध वस्तुस्वभाव जर बदलणे शक्य नाही तर वासना क्षीण झाल्यावर आतिवाहिक भाव तरी कसा होईल ? श्रीदेवी-ज्ञानाचा दृढ अभ्यास झाला असता ससारवासना क्षीण होतात व त्यामुळे हा देहच आतिवाहिक होतो. लीला-जीव आतिवाहिक देहाने परलोकी जातो व त्याचा मेलेला स्थल देह येथे रहातो, हे सर्वास ठाऊक आहे. तेव्हा एकाच देहाचे आति- वाहिकभावाने जीवत असणे व स्थूलभावाने मरणे एकाच वेळी कसे सभवते ? श्रीदेवी-मरणसमयीं याच शरीरात उत्पन्न होणारी ती आतिवाहि- कता कोणाच्याही अनुभवास येत नाही. फार काय पण त्या मरणोन्मुख प्राण्यासही तिचे ज्ञान होत नाही ( पण ज्ञानाच्या दृढतेमुळे प्राप्त होणारी ही आतिवाहिकता ज्ञात्याच्या अनुभवास येते.) अज्ञानी पारलौकिक देह घेण्याकरिता मरत असतो. यास्तव तो आपल्या अज्ञानाने