Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ बृहद्योगवासिष्ठसार. न्मुक्तानाही वासना असते. कारण तिच्या वाचून त्याचा अन्नपानादि व्यवहार होणे अशक्य आहे. पण त्याची जी वासना असते ती खरी वासनाच नव्हे तर खऱ्या वासनेचा बाध झाल्यावर राहणाऱ्या वासनेच्या अधिष्ठानाच्या मत्त्वाचेच ते शुद्ध वासना हे नाव आहे. ह्मणजे जळून भम्म झालेल्या वस्त्राच्या भस्मास जसे वस्त्र ह्मणावे तशातलाच हा प्रकार आहे. ( सामान्य सत्ता सर्व वासनामध्ये अनुगत असते. व शुद्ध वासना हैं तिचेच नाव आहे, असा त्याचा भावार्थ.) मूर्छा व सुपुप्ति या दोन अवस्थामध्ये योटे अतर आहे. वासनाचा उद्भव होणे व त्याचा काही निमित्ताने पराभव होणे, अशा दोन रीतीनी वामना निद्रित होतात. सुषु- प्तिममयी वासनाचा उद्भव होत नाही व जाग्रतान मुर्छा येते तेव्हा त्या काही निमित्ताने पराभूत होतात. मुषुप्तीत वासनाचा उदय होत नाही व अत करणाच्या विशेष रूपाचा लय झाल्यामुळे त्या अवस्थेत त्याचा उदय होणे शक्यही नाही, हे प्राय सर्व व्यावहारिकास ठाऊक आहे. निद्राकाली वासनाचा उदय होणे ह्मणजे तीच स्वप्नावस्था होय. ही जाग्रत् व सुषुप्ति याच्या मवली अवस्था आहे. जाग्रतीत वासनाचा द ग्वातिशयामुळे पराभव होता, व त्या अवस्थेस मूछो ह्मणतात, हेही तुला ठाऊक आहे. आता तुर्या ह्मणजे काय ते तुला मी सागते. वास- नाचा समूल क्षय होण हाच तुर्यावस्था आहे. परमपदाचा साक्षात्कार झाला असता जाग्रतीतही ही अवस्था प्राप्त होते. तीच जिवत मनुष्याची जीवन्मुक्ति होय. पण या अवस्थेचा अनुभव सामान्य जनास येत नाही. कारण ज्या अवस्थेत सर्व वासनाचा क्षय होणे अवश्य आहे अशी ती अवस्था दीर्घकाल अभ्यास व पुण्याचा प्रचड साठा यावाचून प्राप्त होत नाही. बर्फ उष्णतेमुळे जसे वितळून जाते व त्याचे पाणी होते त्याप्रमाणे शुद्ध सत्त्वाच्या अनु- रोधाने रहाणारे (म्हणजे समाधीच्या योगाने एकाग्र झालेले ) व त्यामुळे वासनारहित झालेले चित्त आतिवाहिकतेस प्राप्त होते. त्यानतर ते व्युत्थान- व्यवहारसमयीही (म्हणजे समाधि सोडून उठल्यावर व्यवहार करीत असतानाही ) दुसऱ्या सगातील व दुसऱ्या जन्मातील चित्ताशी आणि मिद्ध, देव, योगी इत्यादिकाच्या शरीराशी ऐक्य पावते. दीर्घ अभ्यासाच्या योगाने जेव्हा तुझा हा अहभाव शात होईल तेव्हा तुला स्वाभाविक चिद्रूप तेचा अनुभव येईल. तो अनुभव म्हणजे दृश्य प्रपचाची परमावधीच