पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २२. १९७ तू या तात्विक गोष्टींचा विचार केला नव्हतास व त्यामुळे तुझी द्वैत- वासना दृढ व पुष्ट होऊन राहिली होती. तुझ्या दुःखाचें व व्याकुळ होण्याचे कारण ती वासनाच आहे. आता तुला मी या तात्त्विक दृष्टीचा उपदेश केला आहे. त्यामुळे तुझी द्वैतवासना शिथिल होऊन तत्त्ववासना दृढ होईल व अतीं तीच मुक्ति देईल. तुझ्या चित्तात विवेकाचे बीज पडले आहे. हे ससारसज्ञक दृश्य आरंभींच मुळी उत्पन्न झालेले नाही, असे समजल्यावर त्याच्या विषयी तुझ्या चित्तांत वासना कशा उद्भवतील ? द्रष्टा, दृश्य व दर्शन याचा अत्यत अभाव झाल्यावर मन एकाच वस्तूच्या व्यानात तत्पर होऊन क्रमाने तुला निर्विकल्प समाधीचा अनुभव घडेल. त्यामुळे वासनाचा सर्वस्वी क्षय होऊन राग (तृष्णा ), द्वेष इत्यादि वृत्ती उदय पावणार नाहीत. या ससाराचा सभव निर्मूल होईल व येणे- प्रमाणे वरील समाधि प्रतिष्ठित होईल माया व मायेची कार्ये याच्या अधिष्ठानभूत आत्म्याचा तुला अवलब करिता येईल. आत्मावलबन के- ल्याने तुझा भ्रातिरूपी मळ निघून जाईल. भ्रातीच्या अभावी तिचे कारण अविद्या व कार्य वासना याचा बाध होऊन मोक्षाख्य परम पुरुषार्थ तूच स्वत. होशील २१. सर्ग २२-या सर्गात तुर्यावस्थेचे लक्षण, जीवन्मुक्ताची स्थिति, वासना क्षीण ___ होण्याचा उपाय व त्याचा अभ्यास याचे वर्णन केले आहे श्रीदेवी-लीले, ज्ञान दृढ झाले असता स्थूल देहभावाची निवृत्ति व आतिवाहिक देहभावाची प्राप्ति होते, असे जे मी तुला आताच सागितले आहे तेच चागल्या रीतीने समजावे ह्मणून मी अनेक दृष्टात देते.- स्वप्नातील व्यवहार करिताना स्वाप्न देह खरा वाटतो पण तो खरा नसतो. त्याचप्रमाणे जाग्र-काली सत्य वाटणारा हा देह खरा नव्हे. त्याच्या विषयींची वासना क्षीण झाली की, तो असत्य ठरतो. हा स्थूल देहच मी आहे, असे समजणे हीच त्याच्या विषयींची वासना होय. जाग्रत्समयीं मनोराज्यातील किवा स्वप्नातील देह मिथ्या ठरून हा देह जसा भासू लागतो त्याप्रमाणे या देहाची वासना क्षीण झाली असता आतिवाहिक देह स्पष्ट अनुभवास येतो. निजल्यावर वासनाबीज उदय न पावल्यास जशी गाढ झोप लागते त्याप्रमाणे जाग्रतीत सर्व वासनाबीज बाधीत झाले असतां जीवन्मुक्तीचा उदय होतो. आता तू ह्मणशील की, जीव-