पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २१. १९५ व्यावहारिक सत्य पर्वत याचे ऐक्य होईल का ? कधीच नाही. तू म्हण- शील की, मी याला मनोमय समजते. पण नुस्ते समजून काय उपयोग? तसा अनुभव आला पाहिजे. तुम्ही अज्ञ मानव या आतिवाहिक (सूक्ष्म) चित्तदेहासच आधिभौतिक स्थूल देह समजता. नुसते समजतच नाही, तर दीर्घ कालापासून तशी तुमची भावना दृढ झाली आहे ती समाधीच्या अभ्यासावाचून क्षीण होणार नाही. दीर्घकाल समाधीचा अभ्यास केल्यावर हा स्थूल देह आतिवाहिक-भावास प्राप्त होईल. लीला -समाधीच्या अभ्यासाने-माझा देह आतिवाहिक आहे, हा प्रत्यय दृढ झाला असता या देहाची काय वाट होते ? इतर सर्व प्राण्याचे स्थूल देह तर नाश पावतात. त्याप्रमाणेच जीवन्मुक्त योग्याचा देहही नाश पावत असल्यास त्याला आतिवाहिक-भाव कसा प्राप्त होणार ? श्रीदेवी-तत्त्ववेत्याचा देह ज्ञानाच्या योगाने बाधित होत असतो. त्यामुळे जळलेल्या वस्त्राप्रमाणे तो वस्तुतः नसतोच. पण वस्त्र जळल्यावरही जसा त्याचा भास होत असतो त्याप्रमाणे तत्त्वज्ञानानतर पूर्वीच्या वासने- मुळे त्याचा काही काल भास होतो. पण दीर्घ समाधि-अभ्यासाने वासना क्षीण झाली की, तो उत्तरोत्तर सूक्ष्म होत जाऊन आतिवाहिक बनतो. त्याचा नाश होत नाही. कारण जे खरोखर असते त्याचा नाश होतो किंवा होत नाही, असे व्यावहारिक दृष्ट्या तरी म्हणता येते, पण वस्तुत जे मुळी नाहीच त्याचा नाश कसा होणार ? मुलि, दोरीच्या ठिकाणी झालेला सर्पभ्रम दोरीच्या ज्ञानामुळे बाधित झाला असता सर्प नष्ट झाला की नाही, याची चर्चा कशी करिता येईल ? सत्य अविष्टानाचा साक्षात्कार होऊन असत्य भ्रम नाहीसा झाला असता भ्रमाने भासणारा पदार्थ जमा दिसत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञान झाल असता स्थूल देह दिसत नाही. हा कल्पित प्रपच पूर्वी होता, पण तो आता ज्ञानाच्या योगाने बाधित झाला आहे, असे ह्मणणे सुद्धा तात्त्विकदृष्टया बरोबर नाही कारण तत्त्वतः प्रपचाची असभवनाच आहे. ह्मणजे वस्तुतः तो सभवत नाही. तर तुझी आपल्या देहादिकास कसे पहाता ? ह्मणून विचारशील तर सागते. परब्रह्माच्या योगाने अतर्बाह्य व्याप्त व एकात एक असलेले हे कोशपचक यरब्रह्मच आहे. ते आपल्या परम महिम्यामध्ये स्थिर आहे या मिथ्या कार्य समूहात ते मुळीच राहत नाही, असे समजून आली त्या सत्य