पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २१. १९३ कार्यभाव नाही, हे मी वर सागितलेंच आहे. माती व मडके याच्यामध्ये कारण-कार्यभाव येण्यास कुमार, त्याचे चाक, ते फिरवावयाचा दड इत्यादि सहकारी कारणाची गरज असते व त्याच्यामुळेच कोणतेही द्रव्य ( प्रकृति) व त्याचा विकार याच्यामध्ये कारण-कायेभाव भासतो. पण ब्रह्म व जग याच्यामध्ये तो भाव असण्यास कोणचेच सहकारी कारण नाही. हे तत्त्व समजण्यास पुष्कळ दिवस चित्तैकाग्याचा अभ्यास केला पाहिजे. मोठ्या वेगाने बाहेर धावणाऱ्या चित्तवृत्तीस आवरून वरून आत्म्याच्या सन्मुख नेले पाहिजे. वृत्ति आत्मोन्मुख होऊन भेददृष्टि अगदी शात झाल्यावाचून तुला ब्रह्म दिसणार नाही. कारण तू जोपर्यंत देहावर अभिमान ठेवून “ ही मी व हे सर्व मजहून भिन्न " असे मानीत आहेस तोपर्यंत तू अब्रह्मरूप आहेस. ह्मणूनच-या देहावरील अहकार सोडून चैतन्यात मिळून जा, ह्मणजे तुला ते ब्राह्मणगृह दिसेल- असे मी वर सागितले. " मी, तू," इत्यादि जे हे भाव तुझा जीवाच्या अगदी अगवळणी पडले आहेत तेच आह्मास, ब्रह्मरूप झाल्यामुळे, ब्रह्मरूप आहेत, असे वाटते. सकल्पनगररूप अशा या माझेही हे शरीर शुद्ध चित्ताकाशमय आहे. त्यामुळे मी त्याच्या आत असलेले सूक्ष्म व पूर्ण ब्रह्म या शरीराने पहाते. ब्रह्मदेवादी जे हे सर्व शक्तिमान् देव आहेत तेही मजप्रमाणेच विशुद्ध चित्ताच्या योगाने सदा त्या ब्राह्मणाचें दर्शन घेण्यास समर्थ आहेत. ते ब्राह्मणरूप अशा या जगाची व त्यातील सर्व व्यवहाराची स्थिति त्या पूर्ण ब्रह्माच्या एका अशात होते, असें पहा- तात. पण लीले, तू चित्ताच्या ऐकाग्न्याचा अभ्यास केलेला नाहीस. त्यामुळे तुझा आकार ब्रह्मरूप न होता चिदाभासरूप होऊन राहिला आहे. ह्मणून तुला या देहाने ते ब्रह्म वतो ब्राह्मणाचा गिरिग्राम दिसत नाही. याच शरीरात असताना तूच स्व-सकल्पाने रचलेले नगरही जर तुला या शरीराने दिसत नाही तर दुसऱ्याच्या सकल्पाने रचलेले नगर तुला या शरीराने कसे दिसणार ? तात्पर्य तो गिरिग्राम साकल्पिक असल्यामुळे तुला या शरीराने दिसत नाही. यास्तव या देहाचा त्याग करून तू चिदाकाश- रूप हो. संकल्पाने ( मनोराज्याच्या योगानें ) चित्तांत बनविलेले नगर जसे त्या सकल्पकांच्या दृष्टीने त्या वेळेपुरते सत्य असते, झणजे ते देहसाध्य