पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीदेवी-बरे आहे. लीले, पूर्वीप्रमाणेच अचेत्यचिद्रूपमयी दृष्टि करून ह्मणजे कारणब्रह्मरूपतेस प्राप्त होऊन व अहंममभाव सोडून झणजे देहा- ध्यासास विसरून शुद्ध हो. ह्मणजे भूमीवर स्थित असलेल्या पुरुषाचा संकल्प जसा आकाशातील गधर्व नगरास प्राप्त होतो त्याप्रमाणे मायाका- शात असलेल्या त्या सर्गास तू निःसशय प्राप्त होशील व असे झाले असता तू व मी अशा दोघी मिळून निर्विघ्नपणे त्या सर्गास पाहू शकू. हा देह हाच त्याचे दर्शनास मोठा प्रतिबध आहे. लीला-देवि, याच देहाने दुसऱ्या सर्गात का जाता येत नाही ? मजवर सर्वथा अनुग्रह करण्यास तू सज्ज आहेस, ह्मणूनच मी तुला हा त्रास देत आहे, श्रीदेवी-ही अनेक जगे मायामात्र असल्यामुळे वस्तुतः अमूर्त आहेत, पण मिथ्या अज्ञानाच्या प्रभावाने तुह्मास ती सोन्याच्या मुद्रिकेप्रमाणे भासतात. सोने मुद्रिकेचे रूप धारण करिते खरे, पण ते मुद्रिकात्व सोन्याहून निराळे नसते. त्याचप्रमाणे ब्रह्म जगद्रूप होते, पण ते जगत्त्व ब्रह्माहून निराळे नाही. वस्तुत जगत् शून्य आहे. जे दिसते झणजे अनुभवास येते ते ब्रह्म आहे. नदीच्या काठची धूळ जशी नदीच्या पाण्यात प्रतिबिबित झालेली दिसते त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये ही अवर्णनीय माया दिसते. प्रपच मायेचे कार्य आहे; ह्मणून तो मिथ्या आहे. ब्रह्म मात्र सत्य आहे. तुझा प्रत्यगात्माही ब्रह्म आहे. प्रत्यगात्मा व ब्रह्म याचे ऐक्य आहे. ह्मणूनच ब्रह्मास अद्वय ह्मणतात. जग मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे व सर्व शरीरात साक्षि-चैतन्यरूपाने असणारा प्रत्यगात्मा व ब्रह्म याचे ऐक्य आहे. याविषयी प्रमाण काय ह्मणून विचारशील तर सागते. त्याविपयी वेदान्त झ- णजे सर्व उपनिषदे व ब्रह्ममीमासाशास्त्र हे मुख्य प्रमाण आहे. त्यांचा तात्पर्यार्थ अनुभवास आणून देण्याकरिता गुरु हे दुसरे प्रमाण आहे व आपला अनुभव हे फलीभूत तिसरे प्र- माण आहे. लीले, ब्रह्मच ब्रह्माला पाहू शकते. जे ब्रह्म नव्हे ते अब्रह्म त्यास पाहू शकत नाही. सगोदि नावाचा जो हा प्रपच पसरला आहे तो त्या परमात्म्याचा स्वभाव आहे. स्वभाव ह्मणजे आच्छादित झालेली सत्ता. ह्मणजेच आवरणशक्तियुक्त माया. वस्तुतः ब्रह्म व जग यामध्ये कारण-