पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २१. १९१ व तिचे कार्य या दोघाचीही उपेक्षा करून त्या उभयतामध्ये अनुगत असणारे सन्मात्ररूप महा चैतन्यच स्मरण ( अतःकरण, वेदन, ) आहे. यास्तव तूही तसेच समज. अशा ज्ञानालाच प्रत्यग्दर्शन ह्मणातात. अशा प्रकारच्या या ज्ञानाच्या योगाने वर सागितलेली कार्य-कारणता बाधित होते व कार्य-कारणता हा शब्द मात्र रहातो. पण तो खरा नव्हे. कारण अर्थावाचून केवल शब्द व्यर्थ आहे. हेच तत्त्व तुला अधिक चांगले समजावें ह्मणून मी आणखी एक व्यावहारिक दृष्टात देते-कुभार माती कालवून व तिचे गोळे करून नतर प्रत्येक गोळ्याचे एकेक भाडे करितो, हे तुला ठाऊक असेलच. मातीचा गोळा व त्याचे केलेले भाडे या दोघाचा विचार मनात आणिला ह्मणजे भाड्याच्या पूर्वी असलेली मातीची अवस्था (गोळा ) हे कारण व मागून झालेली अवस्था ( भाडे ) हे कार्य अशी कल्पना होते. पण केवल माती याच दृष्टीने पाहिल्यास भाडे, गोळा व सुकी माती याचे एकच स्पष्ट तत्त्व दिसते त्या तिन्ही अवस्थेत मातीवाचून दुसरे काही आढळत नाही. हे कार्य व हे त्याचे कारण अशी भावना त्यावेळी होत नाही. त्याचप्रमाणे मायावी ईश्वर व प्रपच या दोघाचा विचार करू लागले असता एक कारण व दुसरे ( प्रपच ) कार्य अशी बुद्धि होते. पण केवल एकरूप चिन्मा- त्राकडे दृष्टि देऊन विचार करू लागले की, मायावी ईश्वर नाही व प्रपचही नाही, असें होतें. तस्मात् , बाई लीले, हा सर्व ससार प्रत्यगात्म्याचे टायी केवल कल्पनामय आहे. या माझ्या सागण्यावर तुझा विश्वास वसत नसेल, तर प्रत्यग्दृष्टीने अधिक विचार कर __ असो, याप्रमाणे हे दृश्य जगत् किवा यातील दुसरे काहीही उत्पन्न झाले नाही. तर हे एक चिदाकाशच आहे. त्याला स्वत.च्या अस्तित्वाकरितां दमय कोणाचीही गरज नाही. लीला--देवि, तू मला ही एक परम दृष्टि दिलीस. तिच्या योगाने आता तुझे झणणे माझ्या अनुभवास या लागले. प्रात कालच्या प्रभेन्या योगाने जशी जगाची शोभा स्पष्ट दिसावी त्याप्रमाणे तुझा सिद्धात मला आता स्पष्ट दिसत आहे. मी आता अगोदर जभ्यासाच्या योगाने हे तत्त्वज्ञान दृढ करितें. तोपर्यंत, हे माते, तू मला त्या ब्राह्मणाच्या पर्वता- | वरील ग्रामाकडे घेऊन चल. मला तो सर्ग पहावासा वाटतो.