पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २१. १८९ निवृत्तीचे मुख्य साधन आहे. दोरीच्या साक्षात्कारावाचून दुसऱ्या हजारों उपयांनीही सर्पभ्रम नष्ट होणार नाही. त्याचप्रमाणे अविधेचा बाध होऊन आत्म्याचा साक्षात्कार झाल्यावाचून जगम जाणार नाही. भ्रमामुळे भासलेल्या सर्पाकडे दुर्लक्ष्य केले असता त्याची तेवढ्यावेळेपुरती निवृत्ति होते; ह्मणजे त्याचे विस्मरण होते; पण पुनः तिकडे लक्ष्य गेले असता तो पूर्वीप्रमाणेच भासतो; हे तुला ठाऊक आहे. त्याचप्रमाणे योगाभ्यास करून चित्त शात केल्यानेही काहीकाल जगाचे विस्मरण होते. पण ने समाधि सोडून विक्षिप्त झाले की, पुनः पूर्ववत् जग अनुभवास येते. यास्तव समाधि, निद्रा व मूर्छा या अवस्थेतील विस्मरणाप्रमाणे जगाचें अर्धे विस्मरण होऊन काही लाभ होणार नाही. तर अविद्येच्या बाधानतर होणारे जगाचे पूर्ण विस्मरणच झाले पाहिजे. तेच मुक्तिरूप आहे. यास्तव हा सर्व अवाढव्य ससार परमात्मरूप आहे, असा तू निश्चय कर. अवि- येचा बाध झाल्यावरही हे भासेल, नाही असे मी ह्मणत नाही. पण ते भासले तरी मिथ्यारूपाने भासेल. पूर्वीप्रमाणे सत्यरूपाने भासणार नाही. भाड्यातले तूप किवा तेल ओतून घेतले असता त्या भाड्यास जसा त्याचा अश (बुळबुळीतपणा ) रहातो त्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराने अविद्यानिवृत्ति झाली तरी देह असेपर्यंत तिचा अश अवशिष्ट रहातो. त्यामुळे साक्षात्कारानतर व अविद्यानिवृत्ति झाल्यावरही जगाचा अस्पष्ट अनुभव येणे शक्य आहे. पण तो जरी आला तरी त्याच्या योगाने मुक्तीस बाध येत नाही. कारण तो अस्पष्ट अनुभव आत्म्यास आच्छादित करण्यास समर्थ हात नाही. लीला--जननि, तृ मगाशी असे झटलेस की, या आमच्या सर्गाचे कारण त्या ब्राह्मण-ब्राह्मणीच्या सर्गातील परिचित वासना आहे. पण ते मला बरोबर दिसत नाही. कारण स्मरणरूप अशा या सर्गास कारण होणारे सस्कार या वेळी दिसणाऱ्या या सर्गाच्या अनुभवावाचून होणे अशक्य आहे व हा सर्ग तर पूर्वी नव्हता. तेव्हा या सगाच्या अनु- भवावाचून त्याच्या स्मरणास कारण होणारी सस्काररूप वासना कशी उद्भवणार ? ___ श्रीदेवी--मुलि, ही तुझी समजूत बरोबर नाही. वासना झणजे काय हे तुला पुढे चागले समजेल, तूर्त वासना ह्मणजे सस्कार इतकेच तूं