पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ बृहद्योगवासिष्ठसार. विषय व इंद्रियादि अनुभवाची साधनेही ती दृक्-शक्तिच होते, असे तू समज. सर्व लाटा पाण्यापासून उद्भवतात. मग त्या समुद्रातल्या असोत, तळ्यातल्या असोत की, लहानशा डबक्यातल्या असोत. त्याप्रमाणेच द्रष्टा, दर्शन व दृश्य हा सर्व त्या एका दृक्शक्तीचा विलास आहे. मग तो विलास परलोकचा असो, इहलोकचा असो की, स्वप्नातला असो, साराश चैतन्यरूप आत्मा हेच या जगाचे खरे रूप आहे. त्याला स्वतःचे ह्मणून खरे रूप मुळीच नाही. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, इत्यादि प्रमाणाच्या रूपाने ने अविष्ठान चैतन्यच भासते. कारण अज्ञात व अबाध्य जे असते तेच प्रमाणाचा विषय होते, असा नियम आहे. जे ज्ञात असते त्याच्या ठायी प्रमाण प्रवृत्त होत नाही व जें बाधित होणारे असते त्याच्या ठायीही प्रमाण प्रवृत्त नाही, असा अनुभवही आहे. जड वस्तूचे ठायी आवरणाच्या कृत्याचा अभाव असतो. त्यामुळे त्याच्या ठायी प्रमाण जरी प्रवृत्त झाले तरी त्याचा उपयोग होत नाही. तस्मात् प्रमाणाच्या प्रवृत्तीस चैतन्यच योग्य आहे, जड नाही, असे समजण्यास काही हरकत नाही. आता तू कदाचित् ह्मणशील की, लाटान्या योगाने पाणी जसे चचल व वेगयुक्त होते त्याप्रमाणे दृक्-शक्ति विषययुक्त झाल्याने दूषित होईल. तर ते बरोबर नाही कारण कोणत्याही अरोपित भावामुळे अधिष्ठान दूपित होत नाही. कापसाच्या ढिगावर ठेविलेला गुजेचा पुजका निखान्यासारिखा जरी एकाद्यास दुरून दिमला तरी तो कापसास जाळू शकत नाही. त्याचप्रमाणे चैतन्य शक्ति जरी विषयाकार झाली तरी ती दूषित होत नाही. तरग हा पाण्याचा स्वाभाविक धर्म नव्हे. तसाच विषयाकार हा चैतन्याचा स्वाभाविक धर्म नव्हे. जल आपला जलभाव न सोडिता जसे तरग रूपाने काही काल भासते व लाटेचे निमित्त नाहीसे झाले असता पुन. आपल्या स्वाभाविक रूपाने रहाते त्याचप्रमाणे चैतन्यही आपल्या चित्त्वास न सोडता विषयाकार भासते व विषयरूप निमित्त ( उपाधि ) निवृत्त झाले की, आपल्या स्वाभाविक स्वरूपाने रहाते. एवढ्याकरिताच आह्मी या विकाररूप दृश्यास असत् ह्मणतो. दृश्यच जर नाही तर द्रष्टा व दर्शन यास तरी आहे, असे कसें ह्मणता येईल ? सारांश केवल एक हक आहे. बाकी काही नाही.