पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग २०. १८५ अशामध्ये जणुं काय जगाचा समुदाय रहात असतो. यास्तव याहून अधिक आश्चर्य ते कोणते ? चिदात्म्यामध्ये एकेका परमाणूत आंत आंत अनेक जगे भरली आहेत. तेव्हा आता त शका कसची ठेवतेस ? या मायिक बाजारात शक्य व अशक्य याचा मुळी विचारच रहात नाही. लीला-माते, त्या ब्राह्मणाला मरून आज आठवा दिवस ह्मणून तूं ह्मणतेस पण आझाला येथे जन्म घेऊन किती तरी वर्षे झाली आहेत. तेव्हा तीच आम्ही, असे कसे ह्मणता येईल? श्रीदेवी-बाळे, या मायिक सृष्टीत देशाचे दीर्घत्व जसे नाही तसेच कालाचेही नाही. जगाची उत्पत्ति जशी कल्पनामात्र आहे तशीच क्षण, घटिका, दिवस, पक्ष, मास, ऋतु, अयन, वर्ष, युग इत्यादि सर्व कालाची कल्पना आहे. कारण क्षण, कल्प, इत्यादि सर्वजग, मी-तू इत्यादि अभ्यासामुळे ज्यास जन्माचा भ्रम झाला आहे त्यासच भासत असते. __ आता त्याना ते कोणत्या क्रमाने भासते ह्मणून विचारशील तर सागते. जीव एक क्षणभर मिथ्या मरणाचा अनुभव घेऊन पूर्व देहास विसरतो व उत्तर देहास पहातो. पूर्व देहास विसरता क्षणी त्यास ज्या देहाचे दर्शन होते तोच आपला आधार आहे व मी त्या आधारात स्थित आहे, असा तो आकाशरूपी जीव पहातो. पुढे आपला तो आधार हात, पाय, तोड, मस्तक इत्यादि सर्व अवयवानी युक्त आहे, असे त्याच्या अनुभवास येते. काही वेळाने हा माझा पिता, ही माझी माता, हा मी, हे माझे गृह, हे माझे बधु, मला आज इतकी वर्षे झाली, पूर्वी मी लहान होतो, पण आता मोठा झालो आहे, पूर्वी मी अज्ञ होतो, पण आता ज्ञानी झालों आहे, मागे मी दुर्बळ होतो, आता बलाढ्य झालो आहे, हे माझे आप्त आहेत, हे मित्र आहेत, हे शत्रु आहेत, इत्यादि त्याच्या कल्पना दृढ होतात. बधु, मित्र इत्यादिकाचा याच्या देहाशी काही सबध नसतो, पण देहभा- वास प्राप्त झालेल्या चित्ताचा व आत्माकाशाचा अति दृढ ऐक्याध्यास झाल्यामुळे ते आपल्या देहाशी सबद्ध आहेत, असा भ्रम होतो. परंतु त्याच्या चित्तामध्ये असा ससार जरी उद्भवला तरी वस्तुत ते निर्मल आकाशच असते. झणजे त्यात काही उद्भवत नाही. कारण स्वप्नामध्ये केवल दृक्-शक्तिच पदार्थरूप व इद्रियरूप होऊन अनुभव घेते, हे आप- णास ठाऊक आहे. त्याचप्रमाणे जाग्रत्, परलोक, इहलोक इत्यादिकांतील