पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ बृहद्योगवासिष्टसार लीला---पण याप्रमाणे जर हे असत्य आहे तर सत्य असल्यासारखें कसे भासते ४ श्रीदेवी-पच कोशाच्या आत असलेल्या चिदाकाशाच्या सत्यत्वामुळे ही भ्रामक सृष्टीही सत्य भासते. तात्पर्य पूर्व सर्ग असत् आहे. त्यामुळे -याच्या पासून केवल स्मतीच्या योगाने उत्पन्न झालेला हा सर्गही असत्च असला पाहिजे. कारण मृगजळावरील लाटही असत् असते, असे आपण नेहमी पहातों हे तुझें गृहही त्याच्या गृहाकाशामध्येच आहे. तू, मी, वह सर्व दृश्य त्याच्या चिदाकाशरूपच आहे, असे तृ जाण. पण सर्व प्रपच मिथ्या आहे व चिन्मात्र सत्य आहे, याविषयी प्रमाण काय ह्मणून विचारशील तर स्वप्न, भ्रम, सकल्प इत्यादि दृष्टातावरून सिद्ध होणारी अनुमानेच त्याविषयी प्रमाण आहेत. कारण स्वप्नादि मिथ्या आहेत व त्याचा द्रष्टा (साक्षि चित् ) सत्य आहे हे आमा सर्वास आमच्या अनु- भवावरूनच ठाऊक आहे. हा सर्ग फार मोठा आहे, तेव्हा तो ब्राह्म- णाच्या गृहाकाशात कसा राहील, असे तुला वाटत असेल, पण तो त्या ब्राह्मणाच्या गृहाकाशातील त्या ब्राह्मणाच्याच जीवाकाशाच्या एका कोपऱ्यात रहात असतो, हे तु ध्यानात धर. ह्मणजे समुद्र, वने, अनेक पर्वत, नद्या, नगरे, ग्राम, असख्य प्राणी इत्यादिकानी भरलेला हा अवाढव्य भूलोक त्या द्विजाच्या जीवाकाशातही कोठ एका कोपऱ्यात असतो. ब्राह्मणाच्या गृहाकाशापेक्षा किती तरी लहान असलेल्या जीवाकाशासही तो भरून टाकू शकत नाही. मग त्याच्या गृहाकाशाची गोष्ट तर दूरच राहू दे. तेव्हा आता हे तुझे भव्य नगर त्या जीवाकाशात राहील की नाही, याचा तूच विचार कर अग खुळे, तू कोणत्या भ्रमात आहेस ? जीवाकाशात हे तुझे विस्तीर्ण नगर ह्मणजे एक कुरळा केस आहे. तुझ्या नगरासारखी सहस्रावधि नगरे ज्या देवीच्या पाठीवर नादत आहेत ती भगवती वसुधराही जर त्या आकाशास व्यापू शकत नाही तर तुझ्या या एका टिबासारिख्या नगराची कथा काय ? असो; त्या ब्राह्मणाच्या ग्रहामध्ये ही सर्व सृष्टि व तुझे हे नगर जरी उद्भवले आहे तरी ते गृह आहेच. त्याचा नाश झालेला नाही. मातेच्या उदरात ग- र्भाचा उद्भव झाला तरी माता जशी नष्ट होत नाही त्याप्रमाणेच जगदु- त्पत्तीमुळे त्या गृहाचा नाश होत नाही. मुलि, त्या गृहाच्या एका सूदन