पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं–सर्ग २०. १८३ श्रीवसिष्ठ-त्या कृपाळु देवीचे ते भाषण ऐकून लीलेस आश्चर्य वाटले व ती ह्मणाली-देवी तू हे मला काय सागत आहेस ? तो आपल्या गृहातील आकाशात असलेला ब्राह्मण कोठे व आमी येथे अस- लेली दोघेजणे कोठे ? त्याचा प्रदेश निराळा व आमचे हे स्थान अगदी निराळे. त्याचप्रमाणे मी समावीमध्ये पाहिलेला तो पतीचा भव्य सर्गही आपल्या या गृहामध्ये मावणे शक्य नाही. यास्तव तुझे हे भाषण-मत्त रावताला मोहरीच्या उदरात बाधून ठेविले; परमाणून्या उदरात मशकाने अनेक सिहाशी युद्ध केले, कमलान्या मण्यामध्ये मेरु पर्वत ठेविलेला होता, न्याला भुग्याच्या पोराने खाऊन टाकिलें, स्वप्नातील मेघाची गर्जना ऐकून चित्रातील मोर नाचू लागला -इत्यादि वाक्याप्रमाणे-मला असभाव्य वाटते. जननि, कृपा करून मला हेच पुनः चागले समजाऊन साग. श्रीदेवी--लीले, मी तुला काहीतरी सागून फसवीत आहे, असे समजू नकोस. अनृत भाषण करू नये, इत्यादि वैदिक विधीचे आह्मी कधीही उल्लघन करीत नाही. कारण वैदिक मर्यादेचा कोणी भग करू लागल्यास आह्मी त्यास शासन करून तिचे पालन करीत असतो. तेव्हा आमींच तिचा भग कसा करू ? आणि जर कदाचित् आह्मींच त्या मर्यादेचा भग केला तर तिचे रक्षण कोण करणार ? असो, तो आपल्या ग्रामात असलेलाच ब्राह्मणाचा जीवात्मा त्याच आपल्या गृहामध्ये हे सर्व महा राष्ट्र पहातो. राजवासनेने युक्त असलेल्या चिदात्म्याचाच हा सर्व खेळ आहे. लीला--पूर्वी वसिष्ठ व अरुधति असून तीच आहीं आता जर पद्म व लीला झालो आहो तर आझास पूर्व जन्माचे स्मरण का नाही ? व मरणाचे स्वरूप काय आहे ? देवी--बाळे, ती तुमची पूर्व स्मृति लुप्त झाली व आता ही नवी स्मति उत्पन्न झाली आहे. ह्मणजे स्वप्न पडू लागले असता जसे जाग्रतीचे विस्मरण होते तसेच हे झाले आहे व हेच मरण होय. पूर्व अवस्थेचे विस्मरण होणे हेच मरणाचे स्वरूप आहे. स्वप्नामध्ये किवा मनोराज्य करीत असताना जसे त्रिभुवन भासते त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाच्या गृहाम- ध्येच ही विस्तीर्ण भूमि भासत आहे.