पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ बृहद्योगवासिष्ठसार. शास्त्राचा जणु आदर्शच होऊन राहिला. ( आदर्श झणजे आरसा.) तो याचकाचा जणु काय कल्पवृक्ष व श्रेष्ठ ब्राह्मणाचा मुख्य आधार झाला, व धर्मरूपी चद्राचा तो पौर्णिमाच बनला असो, इकडे तो ब्राह्मण स्वगृहातील आकाशात चित्तसस्कारावच्छिन्न आकाशरूप झाला असता त्याचे भूताकाशशरीर मृत झाले तेव्हा त्याची अधती भार्या अतिशय दुखी झाली शोकानीने ती साध्वी पोळून गेली सुकलेल्या उडदाच्या शेगेप्रमाणे तिचे हृदय दुभगले व ती पुण्यवती स्त्री स्थूल देहास टाकून देऊन आतिवाहिक (क्ष्म ) देहाने पतीजवळ गेली. नदी जशी उतरत्या प्रदेशाकडे जाते त्याप्रमाणे ती पतीच्या मागोमाग जाऊन वसत ऋतूत आलेल्या मजरीप्रमाणे आनदाने टवटवीत झाली. असो, त्या पर्वतावरील ग्रामामध्ये अजून त्या ब्राह्मणाचे गह आहे, स्थावर- जगम धन आहे व भूमि आहे. त्यास मरून आज आठ दिवस झाले. त्याचा जीव मात्र गृहाकाशात राहिला आहे १९. सर्ग २० -पतीचा पूर्व जन्म व आचरण ऐकूनही, असे होणे सभवनीय नाही, असे समजणाऱ्या लीलेला ज्ञाप्तिदेवी दृष्टात व युक्ति याच्या योगाने या सर्गात बोध करिते. श्रीदेवी-लीले, तोच ब्राह्मण या जन्मी राजा होऊन तुझा पति झाला व अरुधती नावाची जी त्याची स्त्री तीच तू आहेस. तुमचा जोडा फार चागला आहे. तरुण चक्रवाक पक्ष्याच्या जोडप्याप्रमाणेच तुमचे एकमेकावर प्रेम आहे. तुह्माकडे पाहून कोणाही आस्तिकाला, ही शकरपावतीच भूलोकी अवतार घेऊन आली आहेत की काय, असा भास होतो. असो, हा मी तुला पूर्व ससारक्रम सागितला. त्याव- रून वरील दोन सर्गाप्रमाणे हा पूर्वसर्गही भ्रमच आहे, हे तुझ्या ध्यानात आले असेल. चिदाकाशास 'मी जीव आहे' असा भ्रम होणे, हेच या भ्रात सर्गाचे कारण आहे. या एका भ्रमापासून उत्तरोत्तर दुसरा, तिसरा इत्यादि भ्रमाची परपरा लागते, पण जीवदृष्ट्या हा असत्य आहे. अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्या दृष्टीने पाहिल्यास मात्र त्यात सत्ची अनुवृत्ति होत असल्यामुळे तो सत्य आहे. तेव्हा आता तू यातील कोणत्या सर्गास सत्य समजणार ? व यातील असत्य सर्ग कोणता ? मला तर असे ठाऊक आहे की, सर्व सर्ग एकसारखेच काल्पनिक आहेत.