पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १९. त्याच्या घोड्याच्या नालानी तेथील ढिसूळ भूमि उखळून धुरळा वर उडत होता व त्यान्या योगाने अतरिक्ष आच्छादित होऊन गेले होते. पण स्वत राजा व त्याचा मुकुमार परिवार हत्तीवरील सोन्या-रुप्याच्या अबारीत बसलेला असल्यामुळे त्यातील कोणालाही चूळ, वारा व ऊन याची पीडा होत नव्हती. त्या राजाचे ते अवर्णनीय वैभव पाहून ब्राह्मणान्या मनात अशी कामना उद्भवली. तो ह्मणाला - अहाहा, काय हो हे राजाचे अवर्णनीय मुख ? याच्या भाग्याला उपमाच नाही. मीही या राजासारिखाच हत्ती, घोडे, रथ, पायदळ, पताका, छत्र, चामरे, सेवक, दास, दासी, इ पादि- कानी युक्त असा राजा केव्हा बरे होईन ? या राजाप्रमाणेच मलाही विटाम कधी भोगावयास सापडतील ? या धन्य व परम मुग्वी पुरुषाप्रमाणे मला पुष्पे, चदनाच्या उदया, इतर मुवासिक व चित्तरजक पदार्थ, रमणीय स्त्रिया इत्यादिकाचा यथेच्छ उपभोग कधी मिळेल ? असे बोलून त्या दिवसापासून तो त्याच गोष्टीचा विचार करू लागला. तो यावज्जीव स्वधर्माचे आचरण करीत असे पण त्याला या सकल्पाने मरेपर्यत सोडिल नाही. शेवटी तो ब्राह्मण मातारा झाला. त्याचा मरणकाल जवळ आला ७ सता उपवनातील लता जशी म्लान होते त्याप्रमाणे त्याची अरुवतीना- नाक पत्नी म्लान झाली अमरत्व दुर्लभ आहे, असे ऐकून तिने तुजप्रमाणेच माझी आराधना केली व दोन वर मागितले. पुढे काही दिवसानी तो ब्राह्मण मरण पावला व त्याच गृहाकाशामध्ये जीवाकाश होऊन राहिला. (अतःकरण व वासना याच्या योगाने मर्यादित झालेल्या ब्रह्मास जीवाकाश ह्मणतात ) तो प्राक्तन दृढ सकल्पामुळे पद्म राजा झाला. त्याने आपल्या प्रभावाने सर्व भूमडल जिकून टाकिले व आपल्या प्रतापाने देवलोकासही आपलेसे केले. त्याने कृपालपणे पातालाचेही पालन केले. तात्पर्य तो ब्राह्मण आपल्याच सकल्पामुळे त्रैलोक्य-विजयी व परम शक्तिमान् राजा बनला. शत्रुरूपी वृक्षाचा तो कल्पाग्नि झाला. स्त्रियास तो मदनासारिखा वाटू लागला. विषयरूपी वायूचा तो मेरुच होय. (ह्मणजे शब्दादि विषयाच्या योगाने तो कंपायमान होत नाही.) साधुरूपी सूर्यविकासी कमलाचा तो सूर्य (ह्मणजे साधुपुरुषांस आनंदित करणारा ) होता. तो राजा सर्व