पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० बृहद्योगवासिष्ठसार. त्यामुळे मोठा कोलाहल होत आहे. भूलोक, भुवोक इत्यादि खोत्यातून गावे व नगरे हीच लहान लहान उपकरणी व मोठमोठी पात्र आहेत. समद्र, सरोवरे व विहिरी हेच त्यातील लहानमोठे पाण्याचे हौद आहेत. नद्या हेच पाण्याचे पाट वहात जाऊन त्यातील एका मोठ्या जलाशयास भरून टाकीत आहेत. प्रसगी मेघ त्यातील भूमीवर पाणी शिंपडीत असतात. असो, अशा त्या मडपातील एका कोपऱ्यात एका पर्वतरूपी मातीच्या ढिगावर एक ब्राह्मण रहात होता. तो अग्निहोत्री, स्त्री-पुत्र-पौत्र- सपन्न, नीरोगी, व राजभयरहित असे. वर्णी व आश्रमी लोकाचे परम आतिथ्य करणाऱ्या त्या द्विजोत्तमाजवळ पुष्कळ गायी असून दूधही विपुल असे. तो ज्या मातीच्या ढिगावर राहत होता त्या ढीगावरून पाण्याचे पाट वहात असून झाडे-झुडपेही उगवली होती १८. सर्ग १९-वसिष्ठ नामक ब्राह्मणास एका राजाचे दर्शन झाले; त्यामुळे त्याला राज्याची इच्छा झाली व त्याच दृढ सकल्पामुळे तो राजा झाला, असे या पद्मराजाच्या पूर्वजन्माचे वर्णन येथे केले आहे. श्रीदेवी-तो द्विज वित्त, वेप, वय, कर्म, विद्या, वैभव व आचरण याच्या योगाने अगदी वसिष्ठासारखा होता. पण वसिष्ठाप्रमाणे तो कोणा- चाही पगोहित झाला नव्हता व त्याला राजपुत्रास शिकवावेही लागत नसे त्या ब्राह्मणाचेही वसिष्ठ असेच नाव होते. त्याच्या भार्येचे नावही अरुधर्ता होते. पण ही भूमिस्थ आकाशात होती व तो प्रसिद्ध अरुधती अतरिक्षात होती, एवढेच त्याच्यामध्ये अतर होते. वित्त, वेप, वय, कर्म, विद्या इत्यादिकानी तीही अरुधतीसारखीच होती खरी; पण तिच्यासारिखी ज्ञानी मात्र नव्हती. ती गजगामिनी स्वभावत.च प्रेमळ असे. तिचे मुख सदा आनदचिह- यक्त दिसे. तीच त्या ब्राह्मणाचे सर्वस्व होते. असो; एकदा तो ब्राह्मण त्या ढिगाच्या शिखरावर कोवळ्या व हिरव्या गवतावर बसला असता त्याच्या पायथ्याशी एक राजा आपल्या सर्व परिवारासह मगया करीत करीत आला. तो मागोने मोठ्या थाटाने चालला असता त्या ब्राह्मणाची दृष्टी त्याच्याकडे गेली. त्याच्या सैन्यातील लोक जणु काय मेरु पर्वतास दभंगन टाकण्याच्या इच्छेनेच मोठा घोष करीत होते. तो राजा चामरे व पताका याच्या योगाने लता-वनास चद्रकिरणानी व्याप्त असल्याप्रमाणे व शुभ्र छत्राच्या समूहाने अंतरिक्षास रुप्याने मढविल्याप्रमाणे करीत होता.