पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १८. १७९ या समयीही तो माझ्या समोर नाही. अर्थात् हे मुद्धा त्याच्याप्रमाणे स्मरणच आहे. श्रीदेवी-वा, फार चागले समजलीस. मुलि, आत्म्यामव्येच हा सर्व असत् सगे त्या त्या निरनिराळ्या वस्तूच्या स्वरूपाने भासतो. मला, हे परम सत्य स्पष्ट दिसत आहे ___ लीला--आई, माझ्या पतीचा असत्सर्ग या सर्गापासून कसा झाला ते मला साग. ह्मणजे माझा हा जगभ्रम नाहीसा होईल. श्रीदेवी-बरे आहे. वत्से, मी तुझ्या इच्छेप्रमाणे अगोदर तुला, हा सर्ग पूर्वसर्गविषयक अनुभवजन्य भ्राति आहे, (ह्मणजे जगाच्या पूर्वी आलेल्या अनुभवापासून झालेली स्मृतिरूप भ्राति आहे,) हे समजावून देते. ( ससार हा एक जुना मडप आहे, असे आता देवी वर्णन करीत आहे.) चिदाकाशाच्या एका लहानशा भागात एक ससारसज्ञक मडप आहे. त्याची आकृति काचेसारख्या स्वच्छ व नीलवर्ण आकाशाने आच्छादित केलेली आहे. मेरु हा त्याचा मुदर स्तभ (धारण) आहे. त्याच्यावर इद्रादि लोकपाल व त्याच्या इद्राणी इत्यादि स्त्रिया ही बाहुली खोदली आहेत. चवदा भुवने ह्या त्यातील खोल्या आहेत. स्वर्गलोक, मर्त्यलोक व पाताललोक हे त्यास तीन मजले आहेत. सूर्य हा त्या मंडपात दिवा लाविला आहे. त्या मडपान्या मध्यभागी मुग्याच्या वारुळासारिख्या नगरादिकानी व्याप्त असलेले पर्वतादि-दगडामातीचे ढीग आहेत. (ह्मणजे पर्वत हेच त्यातील ढीग असून त्याच्या पायथ्याशी, मध्ये व वर लहान- मोठी गावे हीच मग्याची वारुळे आहेत) तो मडप प्रजापतिसज्ञक एका अनेक पुत्र-पौत्रसपन्न माताऱ्या ब्राह्मणाचे रहाण्याचे स्थळ आहे त्यात जीवसमूह हेच असख्य कोशकार आहेत. (कोशकार हे एका जातीचे कोळी आहेत. ते आपल्या अगाभोवती जाळे करून आपणच आपल्यास बाधून घेतात.) त्याला वर निळे गुळगुळीत छत लाविले आहे. आका- शगामी सिद्धाचा सघ हीच त्यात चिलटे घुमधुमत आहेत. मेघ हेच त्यातील धुराचे लोट असन त्यानी कोठे कोटे त्याचा मध्यभाग व्या-- पिला आहे. वायूचे वाहण्याचे मार्ग हेच त्यातील मोठे मोठे वासे असन विमानात बसून जाणारे सिद्ध हेच त्याच्यावरून फिरणारे किडे आहेत. देव, दानव इत्यादि दुष्ट पोराच्या लीला त्यात एकसारिख्या चालल्या असून