पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ बृहद्योगवासिष्ठसार. कारण जे काम-कर्मवासना व अविद्या त्याहून भिन्न नसते. अर्थात् तुझ्या पतीच्या सर्गाचे मुख्य कारण, मृत्तिका व घट याच्याप्रमाणे विचित्र नाही. तर दीपाप्रमाणे सलक्षणच आहे. __ लीला-देवि, मला असे वाटते की, माझ्या पतीचा सर्ग ही केवळ स्मृति आहे. ती या सत्य सर्गाच्या अनुभवापासून उत्पन्न झालेल्या सस्का- राच्या योगाने झाली असावी. कारण कोणतीही स्मृति अनुभवजन्य संस्कारामुळेच होत असते. मला या सत्य सर्गाचा अनुभव पूर्वीच आलेला होता. त्या अनुभवाचे सूक्ष्म सस्कार चित्तात राहून मिथ्या स्वप्नाप्रमाणे त्याचे म्मरणामध्ये पर्यवसान झालेले असावे आणि त्यामुळे हा सत्य सग त्या असत्य सर्गाचे कारण नसून सत्य सगोची स्मृति त्याचे कारण आहे, असे मी समजते. श्रीदेवी--पण असे जरी झटले तरी हा सर्ग सत्य ठरत नाही कारण पूर्वदृष्ट सगोच्या अनुभवामुळे तो मिथ्या सगे स्मतिरूपाने भासला, असे मानल्यास हा सगेही अवश्य मिथ्या ठरतो. स्मरणकाली विषय पुढे नसतो. यास्तव स्मति आकाशरूप आहे, असे ह्मणावे लागते, हे तुलाही मान्य आहे. ह्मणूनच तृ भत्यांच्या सोला कृत्रिम व स्मतिरूप ह्मणत आहेस पण यावर मी आणग्वी असे ह्मणते की, केवल तोच स्मृतिरूप आहे, असे नाही. तर त्याच्या स्मृतीस कारण होणारा हा पूर्वसर्गही तसाच मिथ्या किंवा स्मृतिरूप आहे. कारण हा सुद्धा त्या मिथ्यासर्गाप्रमाणेच पूर्वीच्या अनुभवामुळे तुला यावेळी भासत आहे. कारण तू ज्याला हा ह्मणून यावेळी ह्मणत आहेस तो सर्ग तरी तुझ्या पुढे कोठे आहे ? पूर्व-अनुभवापासून सस्कार उत्पन्न होतो व सस्कारापासून स्मति होत, हे जगप्रसिद्ध आहे. यास्तव जसा तो सर्ग स्मृतिरूप तसाच हाही स्मृतिरूप होय. लीला--होय. सर्वज्ञ ईश्वरि, तुझे ह्मणणे खरे आहे माझ्या नाचा सर्ग जसा स्मृतिरूप स्वप्नासारिखा आहे, असे मी ह्मणत होते तसाच हाही स्मतिरूप स्वप्नसारिखाच आहे, हे माझ्या आता ध्यानात आले. कारण मला जेव्हा तो सर्ग भासला त्यावेळी जसा हा सर्ग तेथे माझ्या डोळ्यासमोर नव्हता तसाच ज्यावेळी (आता ) मी यास हा असे ह्मणत आहे त्या