पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १८. १७७ नाही. कारणं अकृत्रिम ( सत्य) कारणापासून कृत्रिम कार्य होणे शक्य नाही. कारण, कार्य-कारणांमध्ये सादृश्यच असावे लागते. ह्मणजे कारणाहून कार्य विलक्षण नसते. तर तें कारणसलक्षणच उत्पन्न होते, असा नियम आहे. लीला-पण जननि, कारणाहून कार्य विलक्षण असते, असाही अनुभव येतो. केवळ माती पाण्यास धारण करू शकत नाही. पण तिचे कार्य जो घट (घागर ) त्यात पाणी ठेविता येते व तोही त्यास आपल्यामध्ये हवे तितके दिवस धारण करू शकतो. देवी-खरे आहे. उपादान कारणामध्ये किवा सहकारी कारणामध्ये विलक्षणता असल्यास तदनुरूप कार्यामध्येही विचित्रता दिसते; पण 'कार्य-कारणामध्ये विचित्रता नसते' ह्मणून जे मी वर झटले आहे ते समान (सलक्षण, अविलक्षण) उपादान कारणाच्या कार्यास अनलक्षुन मटले आहे. एका दिव्यावर लाविलेले दुसरे अनेक दिवे आपल्या कारणाहून विलक्षण नसतात. तू वर ज्या सर्गाचा निर्देश केला आहेस तोही या दिव्याच्या दृष्टाताप्रमाणेच समान उपादान कारणापासून उद्भ- वलेला आहे. ह्मणजे तुझ्या पतीचा सर्ग या अवस्थेतील सर्गाचे कार्य आहे. तो कृत्रिम आहे, असे तूच ह्मणतेस. तेव्हा त्याचे कारण जो हा सर्ग तोही त्याच्या प्रमाणेच ह्मणजे कृत्रिमच असला पाहिजे. पण तू कदा- चित् ह्मणशील की-असे नाही. माझ्या पतीच्या सर्गाहून हा सर्ग विलक्षण आहे. पण ते बरोबर नाही. कारण त्या दोन्ही सर्गाचे कारण माया, काम व कर्मवासना हे एकच आहे. अर्थात् तें विलक्षण नाही, असें मी समजते. पण तुला जर ते पटत नसेल तर मला सांग पाहूं की, या सर्गातील पृथ्वी, जल, वृक्ष, पाषाण इत्यादिकातील कोणती वस्तु तुझ्या भाच्या सगातील पृथ्व्यादिकाचे कारण आहे ? कोणतीच नाही. जर आहे ह्मणून ह्मणावे तर या सृष्टीतील पृथ्वी उठून त्या सृष्टीत गे- व्यावर ही सृष्टि पृथ्वीरहित झाल्यावाचून कशी राहील ? बरे येथील पथ्य येथे राहनच त्या पृथ्वीचे कारण होते ह्मणून ह्मणावे तर एका अवस्थेतील वस्त दसऱ्या अवस्थेत न जाता तेथील कार्याचे कारण कशी होईल ? तस्मात् वस्तुतः येथील सहकारी कारणांच्या अभावीही कार्याच्या उत्पत्ती- करिता सामग्रीलक्षण सहकारिता अवश्य कल्पावी लागते व ती पूर्वसर्गाचे १२