पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ बृहद्योगवासिष्ठसार. चेच होते. त्याची भापा, वेष, योग्यता, इत्यादि कशातही काडीइतके सुद्धा अतर नव्हते. काही काही स्थळी तिला पूर्वी न पाहिलेल्या वस्तूचे व ग्राण्याचेही दर्शन झाले. तो सर्व चमत्कार पाहून तिला वाटले की, आपल्या नग- रातील सर्वच लोक मले की काय' ही शका येताच तिला त्या नव्या नगरात राहावेसे वाटेना. ती त्या ज्ञप्तीच्या कृपन लागलीच आपल्या अत पुगत आली. ह्मणजे समाधि सोडून देहभानावर आली. तो तिला ते प्रवाप्रमाणेच सुरक्षित आहे, असे दिसले. आपले सर्व सेवक स्वस्थ ओप घेत आहेत, पुष्पाच्या राशीमध्ये पतीच शव जसेच्या तसेच आहे; वाड्या बाहेर रक्षफगण नगराचे व राजगृहाव नेहमीप्रमाणेच सरक्षण करीत आहेत व श्वानादि पशू मधून मधून ओरडत आहेत, असा तिला अनभव आला तेव्हा तिने आपल्या सख्यान जागे केले, व मटले- नग्न्यानो मला अतिशय दु ख होत आहे. यास्तव आपण राजसभेत जाऊ या मी या माझ्या स्वामीच्या सिंहासनाच्या एका बाजूस बसून मर्व सभासदास एकटा आपल्या डोळ्यानी पाहते, ह्मणजे माझें द ग्व जरा कमी होईट सभेतील पूर्वीच्या सर्व लोकास पाहिल्यावाचून मी जोवत राहू शकणार नाही हे तिचे भाषण ऐकून सख्यानी अत:- पुरातील सर्व सेवकास उठविले व त्या राणीची इच्छा त्यास कळविली. त्याबरोबर नगरातील सर्व सभासदास बोलावून आणण्याकरिता भालदार व चोपदार नगरात गेले इतर सेवकानी सभास्थान झाडून व धुवून निर्मळ केले. चोहोकडे दीप लाविले त्या बरोबर अधकार कोठे पळून गेला त्याचा पत्ताही लागेना इतक्यात राणीची इच्छा ऐकून सर्व पौरजन सभाम्थानी आले ते सभास्थान लोकान्या समूहानी भरून गेले. त्यावेळी रात्र असत्यामळे अतरिक्षात अनेक लहान-मोठी नक्षत्रे चमकत होती त्याच्याकडे पहाणारास असे वाटे की, हा चमत्कार पहाण्याकरि- ताच ती आली आहेत सभासद आपल्या स्थानी आरूढ झाले; शुभ्र वस्त्रे परिधान करणारे द्वारपाल द्वारात उभे राहिले व चोहोंकडून सिहासनावर पष्पवृष्टि सुरू झाली. त्यानतर मुख्य सिहासनाच्या जवळच असलेल्या सुवर्णाच्या चित्रविचित्र व नूतन आसनावर लीला बसली. पूर्वीचे सर्व राजे व सर्व पौरजन तिच्या दृष्टी पडले. राजाच्या सभेत जे