पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १६, १७. १७३ राजाचा समूह तिष्ठत उभा होता. पश्चिमद्वाराबाहेर असख्य कलाकुशल स्त्रिया वाट पहात होत्या व उत्तरद्वाराच्या बाहेर असख्य हत्ती, घोडे, रथ इत्यादिकाची एकच गर्दी होऊन राहिली होती. त्या राजाने एका मान्य सेवकाच्या सागण्यावरून दक्षिणापथी युद्ध करण्याचा निश्चय केला. सर्व राजे त्याच्या अधीन असल्यामुळे त्यानी त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व व्यवस्था केली. कर्णाटनाथाने पूर्व देशाची मर्यादा स्थापिली, सुराष्ट देशाच्या स्वामीने म्लेच्छान्या उत्तरापथास आपल्या स्वाधीन करून घेतले, व मालव देशच्या राजाने पश्चिमेतील तगण प्रदेशस्थ सर्व लोकास व्यापिले. चारी दिशातील समुद्राच्या तीरापर्यंत जाऊन आलेले दत तेथील नाना प्रकारचे चमत्कार सागून त्याचे मनोरजन करीत होते ओळीने उभे राहिलेले असख्य राजे त्याच्या सभागृहास आपल्या कातीने सुशोभित करीत होते. यज्ञमडपात ब्राह्मण वेदघोप करीत होते. त्याच्या ध्वनीपुढे वाद्याचा ध्वनीही तुच्छ झाला होता. स्तुतिपाठकाच्या कोला- हलाने दिशा दुमदुमून गेल्या. गायन, वादन, नृत्य इत्यादिकाचा ध्वनि आकाशास व्यापून टाकीत होता. त्या राजगृहात पुष्पे, कर्पूर, धूप, अगुरु, चदन, इत्यादिकाचा सुवास पसरला होता. त्या भाग्यवान् राजाचे अनेक सेवक अनेक देशातून आलेल्या भेटी राजवाड्यात व्यवस्थेने माडून ठेवीत होते. त्याचे मारलिक अनेक कार्यामध्ये व्यग्र होते व त्याने अनेक शिल्पशास्त्रज्ञाकडून जी अनेक उत्तम उत्तम नगरे निर्माण करविणेस आरंभ केला होता त्याचाही तेथे विचार चालला होता. साराश येणेप्रमाणे एका भव्य नगरातील भव्य राजगृहात तो आपला पति अनेक कार्यामध्ये आसक्त झाला आहे, असे तिच्या दृष्टी पडले. तेव्हा ती वासनारूपी लीला त्या वासनारूपी राजगृहात शिरली. ती केवळ सकल्पमय लीला त्या सभेत चोहोकडे फिरत होती. पण कामी पुरुषानी आपल्या सकल्पाने निर्मिलेली स्त्री जशी त्यास दिसत नाही त्याप्रमाणे ती कोणाच्या दृष्टी पडली नाही. एकाच्या मनातील सकल्प जसा दुसऱ्यास कळत नाही तसाच तिचा देह त्या सभेतील एकालाही दिसला नाही. ती मात्र प्रत्येकाच्या अगदी समीप जाऊन त्यास पहात असे. पण जवळ जाऊन पाहतांच तिला ते सर्व पूर्वीचेच लोक दिसले. राजा, त्याचे सचिव, सेना- पति, माडलिक, न्यायाधीश, विद्वान् ब्राह्मण, सेवक इत्यादि ते सर्व पूर्वी-