पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ बृहद्योगवासिष्ठसार. काशाच्या आधाराने रहातात. पण चिदाकाश त्याच्या वाचूनच राहण्यास समर्थ आहे, इतकेच नव्हे, तर ते ती दोन्ही नसतात तेव्हाच शुद्ध असते व त्या अवस्थेतच त्याचा स्पष्ट अनुभव येतो. तेच तुझ्या पतीचे रहाण्याचे स्थान आहे. तो तेथे गेला आहे व त्याच्या रूपानेच राहिला आहे. वस्तुत. त्याचे स्वरूप पृथक् नाही पण केवल भावनेने तें पृथक् आहे, असे वाटते. त्या चिदाकाशाचा तुला अनुभव कसा येईल, ते सागते. तुझे वृत्तिज्ञान एका पदार्यास सोडून दुसऱ्या पदार्थाकडे जाऊं लागले असता मध्ये जो थोडासा काल जातो झणजे पूर्व पदार्थाचा सकल्प सोडल्यापासून पुढच्या पदार्थाचा सकल्प करीपर्यंत जी अवस्था असते त्यात त्या चिदाकाशाचा चागला अनुभव येतो. त्या सर्व विशेष- रहित व सर्व सकल्पशून्य वस्तूजवळ जर तू गेलीस तर तुझ्या पतीचे वसति-स्थान तुला सापडेल त्या वेळी तू सर्वात्मक पदास अथवा परम तत्त्वासच पोचशील, यात सशय नाही तत्त्वदर्शनामुळे अविद्येचा क्षय हाऊन इताचे भान नाहीसे होणे, याला जगत्-अत्यताभावसपत्ति ह्मणतात. त्या अत्यताभाव-सपतीच्या योगानेच त्याची प्राप्ति होते. दुसऱ्या कोण- त्याही उपायाने होत नाही. हे सुदरि, माझ्या वरामुळे तू त्या पदास निर्विघ्नपणे प्राप्त होशील. श्रीवसिष्ठ-असे सागून ती ज्ञप्तिदेवी आपल्या दिव्यस्थानी गेली व लीलाही वरप्रभावामुळे फारसा अभ्यास न करिताच निर्विकल्प समाधि लावून बसली. समाधीचा लाभ होताच तिचा देहाभिमान सुटला. घरट्यातून निघालेली चिमणी जशी अतरिक्षात भुर्कन उडून जाते त्या- प्रमाणे ती अतःकरण व देहपजर यास सोडून चिदाकाशात शिरली. त्याच आकाशात वासना-कर्मानुरूप देह, गृह, राजसमूह इत्यादिकानी युक्त असलेल्या आपल्या पतीस तिने पाहिले. तो त्या वेळी सिहासनावर बसला होता. “जय जीव," असें ह्मणून बदिजन त्याची स्तुति करीत होते. मांडलिक राजे व सैन्यातील मुख्य वीर यास बोलावून आणून उपस्थित कार्य कसे सपादन करावे याचा तो विचार करीत होता. अनेक ध्वजानी सुशोभित केलेल्या राजधानीत मुख्य राजगृहामध्ये तो त्या वेळी होता. त्या राजगृहाच्या पूर्व द्वारावर अनेक मुनि व ब्राह्मण याचे थवेच्या थवे उभे होते. दक्षिण द्वारी अनेक