पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ उत्पत्तिप्रकरण-सर्ग १६, १७. १७१ इतक्यात त्या अतिशय विह्वल झालेल्या लीलेच्या अनेक जन्मार्जित पुण्य- परिपाकामुळे आकाशवाणी झाली सरोवर सुकून जाऊन त्यातील मीन अगदी मरावयास टेकले असता एकाएकी जशी दृष्टि व्हावी तसाच सरस्वतीच्या या दयापूर्ण आकाश वाणीचा अकल्पित लाभ झाला. सरस्वती ह्मणते-वत्से, या आपल्या पतीच्या प्रेतास तू पुप्पाच्या ढिगात आच्छादित करून ठेव. त्या ढिगातील पुष्पे मुकणार नाहीत व याचा देहही कुजून नष्ट होणार नाही. पुन लवकरच हा तुझा पति होईल. आकाशासारिखा स्वच्छ असलेला याचा जीव या अत पुर–मडपातून बाहेर जाणार नाही. ही अपूर्व वाणी ऐकून तेथे असलेले लीलेचे सर्व आप्तम- बधी स्त्रीपुरुप चकित झाले त्यानी तिचे समाधान केले व त्या वाणीवर विश्वास ठेवून तिच्या सागण्याप्रमाणे करावयास मागितले, तेव्हा लीलेनेही पुष्पाचा मोठा ढीग करून त्यात आपल्या पतीचे शव पुप्पाच्छादित करून ठेविले, आणि काहीसे समाधान मानून ती राहिली पण तिचे चित्त तिला स्वास्थ्याचा अनुभव घेऊ देईना पूर्वी मोठी श्रीमती असून पुढे दारिद्र्य आले असता जशी एकादीची अवस्था होते तशी तिची दशा झाली. तो दिवस कमाबमा गेला पण रात्री तिला झोप येईना जलरहित शफरीप्रमाणे ती तळमळू लागली शेवटी मध्यरात्रीच्या सुमारास अत:- पुरातील सर्व सेवकवर्ग स्वस्थ झोप घेत आहे, असे पाहून त्या परम पुण्यवतीने शुद्ध ध्यानाच्या योगाने ज्ञप्तिसज्ञक सरस्वती देवीचे ध्यान केले. त्याबरोबर ती जगन्माता तिच्या पुढे येऊन ह्मणाली- वत्से, तू माझे स्मरण का केलेस? तू दुःखीकप्टी का होत आहेस ? या ससार- भ्राती मृगजळाप्रमाणे व्यर्थ भासत असतात. लीला-माझा पति कोठे आहे ? तो काय करीत आहे व कमा आहे ? मला त्याच्या जवळ ने. त्याच्यावाचून मी एकटी जीवत राहण्यास समर्थ नाही. __ श्रीदेवी-चित्ताकाश, चिदाकाश व सर्व प्राण्यास दिसणारे हे पोकळ महाकाश अशी तीन आकाशे आहेत. पण त्यातील चिदाकाश या दुसऱ्या दोन्ही आकाशावाचून असते. वासनामय शरीरास चित्ताकाश ह्मणतात. चित्ताकाश व महाकाश चिदा-